Railway Badminton Tournament Dainik Gomantak
क्रीडा

अनुरा प्रभुदेसाईचे रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत यश

अनुराने वैयक्तिक एकेरीतही अंतिम फेरी गाठली

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई हिने रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत यश संपादन केले. फोंड्याच्या या खेळाडूने 68 व्या अखिल भारतीय रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत दोन रौप्य व एक ब्राँझपदक जिंकले. स्पर्धा विशाखापट्टणम येथे झाली.

अनुराने या स्पर्धेत उत्तर रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व केले. ती जीनो फार्मास्युटिकल्सची ‘सदिच्छा दूत’ आहे. अनुराचा सहभाग असलेल्या उत्तर रेल्वे संघाने सांघिक गटातील अंतिम फेरी गाठली. पश्चिम-मध्य रेल्वे संघाकडून हार स्वीकारल्यामुळे अनुराच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या लढतीत अनुराने एकेरीतील विजय मिळविला.

तिने श्रेयांशी परदेशी हिला 21-19, 25-23 असे हरवले. महिलांच्या दुहेरीत अनुराने कनिका कंवल हिच्यासह भाग घेतला. त्यांना श्रेयांशी परदेशी व भारती पाल जोडीकडून 16-21, 21-14, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

अनुराने वैयक्तिक एकेरीतही अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकाच्या लढतीत तिला श्रेयांशी परदेशी हिच्याकडून 21-11, 21-18 फरकाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ती रौप्यपदकाची मानकरी ठरली. त्यापूर्वी अनुराने उपांत्यपूर्ल लढतीत वैष्णवी भाले हिला, तर उपांत्य लढतीत रिया मुखर्जी हिला हरविले होते. मिश्र दुहेरीत बोधित जोशी याच्यासह खेळताना अनुराला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत त्यांना श्रेयांशी परदेशी व चिराग सेन जोडीकडून 21-8, 21-15 असा पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya: शनिवार ठरणार शुभदायी! 'या' राशींसाठी लकी दिवस; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

SCROLL FOR NEXT