I League Football Dainik Gomantak
क्रीडा

I-League Footbal:'ऐजॉल एफसी'ची कडवी झुंज;'चर्चिल ब्रदर्स'सोबतचा सामना बरोबरीत

दैनिक गोमंतक

पणजी: चर्चिल ब्रदर्सने आज खेळलेल्या आय-लीग फुटबॉल सामन्यात सुरवातीलाच गोल नोंदवून आघाडी घेतली, मात्र शेवटची पंधरा मिनिटे बाकी असताना ऐजॉल एफसीने 1-1 अशी गोलबरोबरी साधली. त्यामुळे दोन वेळच्या माजी विजेत्यांना यावेळच्या स्पर्धेत सलग पाच लढतीनंतर विजयाविना राहावे लागले.

( Aizawl FC Vs Churchill Brothers Match Draw in I-League Football tournament )

चर्चिल ब्रदर्स व ऐजॉल एफसी यांच्यात आज सामना खेळला गेला. हा सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. आयव्हरी कोस्टचा खेळाडू कामो स्टीफन बायी याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला चौथ्याच मिनिटास आघाडी मिळाली. चर्चिल ब्रदर्सतर्फे त्याचा हा स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. लालॉम्पुईया याच्या फ्रीकिक फटक्यावर पोनिफ वाझ याने हेडिंगने चेंडू नियंत्रित करून कामो याला गोलची संधी प्राप्त करून दिली. त्याने गोलरक्षक जाग्यावर नसल्याची संधी अगदी जवळून साधली.

गोव्याचा संघ स्पर्धेतील पहिला सामना जिंकण्याची शक्यता वाटत होती, पण 75 व्या मिनिटास घाना देशाचा खेळाडू हेन्री किसेक्का याच्या हेडिंग गोलमुळे मिझोराममधील संघाने बरोबरी साधली. शेवटपर्यंत गोलबरोबरीची कोंडी कायम राहिल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

चर्चिल ब्रदर्सची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. पाच लढतीतील अन्य तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दोन गुणांसह माजी विजेते अकराव्या स्थानी कायम आहेत. त्यांचा पुढील सामना मंगळवारी (ता. 6) मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्ध होईल. ऐजॉलने सलग दोन पराभवानंतर गुण प्राप्त केला. एकंदरीत त्यांचीही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. पाच लढतीनंतर त्यांनी पाच गुणांची कमाई केली असून ते आठव्या स्थानी आहेत.

  • चर्चिल ब्रदर्स व ऐजॉल एफसी यांच्यात 11 लढती, प्रत्येकी ४ विजय, ३ बरोबरी

  • उभय संघांतील मागील ५ आय-लीग लढतीत ३ बरोबरी

  • यंदा आय-लीगमध्ये चर्चिल ब्रदर्स व सुदेवा दिल्ली या संघांचा एकही विजय नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT