Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

Viral Boat Capsizing Video: आंतरराष्ट्रीय स्तरावरील वत्तृ संस्था रॉयटर्स आणिअसोसिएट प्रेसने यासंबधित एक वत्तृ प्रसिद्ध केले असून, व्हिडिओ संबधित घटना आफ्रिका खंडातील कांगो येथील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गोव्यात समुद्रात बोट पलटी होऊन 26 लोकांचा मृत्यू आणि 64 लोक बेपत्ता झाल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली. कोणतीही सत्यता पडताळून न पाहता ती अनेकांनी शेअरही केली. अनेकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते मात्र हा व्हिडिओ गोव्याचा नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, राणा संघा या एक्सवरील अकाऊंटवरुन बोट अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओची पडताळणी केली असता अशा प्रकारची घटना गोव्यात घडली नसल्याची माहिती समोर आली आहे. संबधित घटना ही आफ्रिका खंडातील कांगो येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com