Supreme Court Dainik Gomantak
क्रीडा

FIFA: 17 वर्षांखालील महिला विश्वचषकाचे आयोजन अडचणीत, SC उद्या करणार सुनावणी

AIFF Vs FIFA News: आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतीय फुटबॉल संघटनेला दिलेली मान्यता स्थगित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

दैनिक गोमन्तक

FIFA Suspended AIFF : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) भारतीय फुटबॉल संघटनेला दिलेली मान्यता स्थगित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यादरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यासंबंधीचे अनेक मुद्दे न्यायालयात उपस्थित केले. मेहता यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले की, 'या स्थगितीमुळे भारतात ऑक्टोबरमध्ये होणारा प्रस्तावित अंडर-17 महिला विश्वचषक अडचणीत आला आहे.' फुटबॉल महासंघाच्या कामकाजाशी संबंधित प्रकरणावर उद्या सुनावणी करावी, अशी विनंती मेहता यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यासोबत हे प्रकरण न्यायालयासमोर मांडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

फिफाने सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाचा आधार घेतला आहे

18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) चे प्रशासन पाहण्यासाठी 3 सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल दवे, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार भास्कर गांगुली या समितीचे सदस्य आहेत.

याआधी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी जवळपास 10 वर्षे एआयएफएफवर नियंत्रण ठेवत होती. एआयएफएफमध्ये बऱ्याच काळापासून निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, 'ही एक अंतरिम व्यवस्था आहे. एआयएफएफची नवीन घटना तयार झाल्यानंतर निवडणुका होतील.'

दुसरीकडे, सॉलिसिटर जनरल यांनी आज न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, न्यायालयाचा आदेश फिफाने फुटबॉल संघटनेत तृतीय पक्षाचा हस्तक्षेप मानला आहे. त्याआधारे एआयएफएफचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे. त्यावर खंडपीठाने म्हटले की, "उद्या याचा अर्थ सुनावणीच्या यादीत आहे. आम्ही आधी सुनावणी करण्याचा प्रयत्न करु."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT