Aiden Markram PTI
क्रीडा

SA vs IND: मार्करमचं एकाकी, पण वादळी शतक! डिविलियर्स, अमलासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Aiden Markram: भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत एका बाजूने नियमित अंतराने विकेट्स जात असताना एडेन मार्करमने झुंजार शतक ठोकले.

Pranali Kodre

South Africa vs India 2nd Test at Cape Town, Aiden Markram Century:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (3 जानेवारी) खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडेन मार्करमने शतकी खेळी केली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच दिवशी दुसऱ्या डावात कर्णधार डीन एल्गार (12), टोनी डी झोर्झी (1) आणि ट्रिस्टन स्टब्स (1) या तिघांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. तसेच दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने सुरुवातीलाच डेव्हिड बेडिंगहॅम (11), काईल वेरेयन (9), मार्को यान्सिन (11), केशव महाराज (3) यांच्याही विकेट्स झटपट घेतल्या.

मात्र, या विकेट्स जात असताना एक बाजू मार्करमने भक्कमपणे सांभाळला होता. दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स गमावलेल्या असताना मार्करमला कागिसो रबाडाने दुसऱ्या बाजूने साथ दिली. त्यामुळे मार्करम दक्षिण आफ्रिकेचा डाव पुढे घेऊन गेला. यादरम्यान, मार्करमने 99 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे 7 वे कसोटी शतक ठरले.

इतकेच नाही, तर त्याने दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत चौथ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतकही ठोकले. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. त्याने 2010 साली सेंच्युरियनला खेळताना 75 चेंडूत शतक केले होते.

तसेच हाशिम आमलाने ८७ चेंडूत, तर डेनिस लिंडसे, जॉन्टी ऱ्होड्स आणि शॉन पोलॉक यांनी प्रत्येकी 95 चेंडूत कसोटी शतक ठोकले आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत चेंडूच्या तुलनेत सर्वात जलद शतक

  • 75 चेंडू - एबी डिविलियर्स (विरुद्ध भारत, सेच्युरियन, 2010)

  • 87 चेंडू - हाशिम आमला (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ, 2012)

  • 95 चेंडू - डेनिस लिंडसे (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग, 1966)

  • 95 चेंडू - जॉन्टी ऱ्होड्स (विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 1999)

  • 95 चेंडू - शॉन पोलॉक (विरुद्ध श्रीलंका, सेंच्युरियन, 2001)

  • 99 चेंडू - एडेन मार्करम (विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024)

दरम्यान, शतकानंतर मार्करम मोहम्मद सिराजविरुद्ध 32 व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र तो बाद होईपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 60 धावांपेक्षा अधिक आघाडी घेतली होती. मार्करमने 103 चेंडूत 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि २ षटकार मारले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 55 धावांवर सर्वबाद झाले होते. तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने 98 धावांची आघाडी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT