Pakistan Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC: हुश्श! पोहचलो एकदाचे सेमी फायनलमध्ये; अखेर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र

यापूर्वी दक्षिण आफ्रिका विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारत देखील सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

T20 World Cup: 'होणार की नाही, होणार की नाही,' म्हणत अखेर पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानच्या आशा पूर्णपणे संपल्या असताना, चमत्कारीक रित्या पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. आज बांग्लादेशसोबत (Bangladesh) झालेल्या सामन्यात पाकिस्नाने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. याविजयामुळे पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जिंवत राहीले आहे.

बांग्लादेशने प्रथम फंलदाजी करताना आठ गड्याच्या बदल्यात 127 धावा केल्या. सलामीवीर शांतोने दमदार अर्थशतक करत संघाला 127 धावांपर्यंत नेले. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक चार बळी घेतले. पाकिस्तानसाठी महत्वाचा असलेल्या या सामन्यात आक्रमक फंलदाजी करत, 18.1 षटकात आव्हान पूर्ण केले. याविजयासह पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान कायम राहिले आहे. पाकिस्तानचे खेळाडू, फॅन्स आणि देशवासीय यांचा जीव भांड्यात पडला असून, आता संघाला सोमी फायनलचे वेध लागले आहेत.

दरम्यान, नेदरलँडचा दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (ICC T20 World Cup 2022) समीकरणं बदलली आहेत. नेदरलँड संघाने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) विजय मिळवला असून, टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी भारत इन तर, आफ्रिका आऊट झाली आहे. नेदरलँडने 20 षटकांत 158 धावा केल्या. आफ्रिकेला ही धावसंख्या पार करता आली नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT