Babar Azam & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam Record: बाबर आझमने केला आणखी एक विश्वविक्रम... Virat Kohli ही मागे

Babar Azam Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आणखी एक विक्रम मोडीत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

Manish Jadhav

Babar Azam Record: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आणखी एक विक्रम मोडीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करण्याचा विक्रम बाबरच्या नावावर आहे. पाकिस्तानी कर्णधाराने 245 डावात हा पराक्रम केला आहे.

त्याच्या आधी हा विक्रम युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर होता. ज्याने 249 डावात ही कामगिरी केली.

त्याचवेळी विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटमध्ये 9000 धावा पूर्ण करण्यासाठी 271 डाव खेळले आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 273 डावांमध्ये ही कामगिरी केली.

याआधीही, बाबर तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आणि या एपिसोडमध्ये, त्याने विराट कोहलीला मागे टाकले होते.

आता पुन्हा एकदा बाबरने विराटचा (बाबर Vs विराट) रेकॉर्ड मोडला आहे. बाबर आझमने पाकिस्तान सुपर लीगच्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान हा पराक्रम केला होता. जेव्हा त्याने पेशावर झल्मीसाठी 39 चेंडूत 64 धावांची कर्णधार खेळी खेळली होती.

यासह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा पूर्ण केल्या. बाबरच्या संघाने या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा 12 धावांनी पराभव करुन एलिमिनेटर 2 मध्ये स्थान मिळवले, जिथे त्यांचा सामना 17 मार्च रोजी शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदरशी होईल.

T20 क्रिकेटमध्ये (इनिंगमध्ये) 9000 धावा करणारा सर्वात वेगवान खेळाडू

1. बाबर आझम - 245

2. ख्रिस गेल - 249

3. विराट कोहली -271

4. डेव्हिड वॉर्नर - 273

5. आरोन फिंच-281

तसेच, रेकॉर्ड फक्त मोडण्यासाठीच बनवले जातात. पण जेव्हा भारत (India) आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांचे विक्रम मोडतात तेव्हा चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच पातळीवर असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT