Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs WI T20 Today: दुसरा सामना जिंकून टीम इंडिया साधणार पाकिस्तानशी बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडिज (IND Vs WI) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी होणार आहे. पहिला सामना 6 गडी राखून जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) नजरा दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर असतील. त्याचबरोबर विंडीजसाठी हा सामना 'करो या मरो' सारखा असेल. (After Winning The Second Match Team India Will Draw With Pakistan)

टीम इंडियाला पाकिस्तानशी सामना करण्याची संधी

भारतीय संघाने सलग 7 टी-20 सामने जिंकले आहेत. जर टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा (West Indies) दुसरा सामनाही जिंकला तर या फॉरमॅटमधील हा सलग 8वा विजय असणार आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम अफगाणिस्तानच्या (Afghanistan) (12) नावावर आहे. अफगाण संघाशिवाय सहयोगी संघ असणाऱ्या रोमानियानेही सलग 12 सामने जिंकले आहेत.

अफगाणिस्तान (11) देखील तिसऱ्या क्रमांकावर असून चौथ्या क्रमांकावर युगांडाने सलग 11 टी-20 सामने जिंकले आहेत. 2009 मध्ये पाकिस्तानने (Pakistan) सलग 7 टी-20 सामने जिंकले असून भारतही सध्या त्याच दिशेने आपली वाटचाल करत आहे.

भारताने 2017 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची तीन टी-20 मालिका जिंकली आहे. 2017 मध्ये भारतीय भूमीवर झालेल्या T20 मालिकेत वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला होता. यानंतर विंडीजला भारताविरुद्ध टी-20 मालिका कधीही जिंकता आली नाही. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला सलग 3 मालिकांमध्ये पराभूत केले आहे. आणि विशेष म्हणजे सध्याच्या मालिकेसाठी देखील रोहीत टीम विजयाचे दावेदार मानले जात आहेत.

पोलार्डच्या संघासाठी सन्मानाची लढत

या दौऱ्यात वेस्ट इंडिजने आतापर्यंत चार सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकदिवसीय मालिकेतही संघ पूर्णपणे विखुरलेला दिसत होता. संघाच्या गोलंदाजांनी वेळोवेळी विकेट्स घेतल्या, परंतु फलंदाजांना आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. विंडीजला मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर दुसऱ्या सामन्यात दामदार कामगिरी करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT