सामना संपल्यानंतर 26 वर्षीय व्यंकटेश आरसीबी (RCB) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) गप्पा मारताना दिसला.
सामना संपल्यानंतर 26 वर्षीय व्यंकटेश आरसीबी (RCB) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) गप्पा मारताना दिसला. Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: सामन्यानंतर कोहली केकेआरच्या 'या' युवा खेळाडूला देतोय फलंदाजीच्या टीप्स

दैनिक गोमन्तक

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) अबुधाबी येथे इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL) च्या 31 व्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) 9 गडी राखून पराभव केला. वरुण चक्रवर्ती (Varun Chakraborty) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) यांनी त्यांच्या धारदार गोलंदाजीने RCB चा डाव केवळ 92 धावांवर गुंडाळला. त्यानंतर, केकेआरसाठी, नवोदित फलंदाज व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) धमाकेदार फलंदाजी करताना आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

इंदूरचा रहिवासी असलेल्या या क्रिकेटपटूने केकेआरसाठी पहिल्या सामन्यात 27 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि एक षटकार मारले. व्यंकटेशने 10 व्या षटकात युझवेंद्र चहलच्या शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारून केकेआरचा विजय साकार केला.

सामना संपल्यानंतर 26 वर्षीय व्यंकटेश आरसीबी आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत गप्पा मारताना दिसला. केकेआरने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात युवा फलंदाज विराटकडून टिप्स घेताना दिसत आहे.

केकेआरने त्या दोघांची पोस्ट शेअर करत, "ड्रीम डेब्यू + क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूकडून शिकणे. व्यंकटेश अय्यरसाठी किती छान रात्र होती.

केकेआरचा कर्णधार इयोन मॉर्गननेही व्यंकटेशने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात केलेल्या खेळीबद्दल कौतुक केले आहे. केकेआर 9 गुणांच्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. तर आरसीबीचे गुणतालिकेतील स्थान कायम आहे. RCB सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआरचा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT