ICC ODI Cricket World Cup 2023, Pakistan vs Afghanistan:
अफगाणिस्तान संघात पार पडला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 8 विकेट्सने विजय मिळवला. हा अफगाणिस्तानचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. याआधी अफगाणिस्तानने या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडलाही पराभवाचा धक्का दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील तिसरा पराभव आहे.
या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर 283 धावांचे अव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने 49 षटकात 2 विकेट्स गमावत 286 धावा करत पूर्ण केले.
अफगाणिस्तानकडून सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान या सलामीवीरांनी 282 धावांचा पाठलाग करताना वैयक्तिक अर्धशतके केली. तसेच त्यांनी 130 धावांची भागीदारीही रचली. पाकिस्तानी गोलंदाजांना पहिल्या 20 षटकांमध्ये एकही विकेट घेता आली नव्हती.
अखेर गुरबाजला 22 व्या षटकात शाहिन आफ्रिदीने उस्मा मीरच्या हातून झेलबाद केले. गुरबाज 53 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 65 धावा करून बाद झाला.
तो बाद झाल्यानंतरही इब्राहिमने रेहमत शाहबरोबर अफगाणिस्तानचा डाव पुढे नेला. या दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी झाली. पण 34 व्या षटकात इब्राहिमला हसन अलीला बाद केले. इब्राहिमने 113 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार मारले.
त्याच्या विकेटनंतरही अफगाणिस्तानकडून रेहमत शहा आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदीने लय कायम ठेवत धावा जमावल्या. रेहमतनेही अर्धशतक केले. या दोघांनीही नंतर पाकिस्तानी गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
अखेर 49 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शाहिदीने चौकार ठोकत अफगाणिस्तानचा विजय निश्चित केले. रेहमत 77 धावांवर नाबाद राहिला, तर शाहिदी 48 धावांवर नाबाद राहिला.
तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक आणि इमाम-उल-हक यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, इमाम 17 धावांवर बाद झाला.
त्यानंतर शफिक आणि कर्णधार बाबर आझमने पाकिस्तानचा डाव सावरत शतकी भागीदारीही केली. त्यांची भागीदारी धोकादायक ठरत असतानाच शफिकला नूर अहमदने पायचीत करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद रिझवानही 8 धावांवर बाद झाला, तर सौद शकिलला 25 धावांवर मोहम्मद नबीने माघारी धाडले.
या विकेट्स जात असताना एक बाजू बाबरने सांभाळली होती. त्याने एक बाजू सांभाळताना अर्धशतकही केले. पण तोही 92 चेंडूत 74 धावांची खेळी करून 42 व्या षटकात नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे पाकिस्तानला 280 धावांचा टप्पा ओलांडता आला. शादाबने 38 चेंडूत 40 धावांची आणि इफ्तिखारने 27 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने 50 षटकात 7 बाद 282 धावा उभारल्या.
अफगाणिस्तानकडून नूर अहमदने 3 विकेट्स घेतल्या, तर नवीन-उल-हकने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.