Afghan Fans Dainik Gomantak
क्रीडा

Team India ने पाक ला हरवताच अफगाणी चाहत्याने टीव्हीवर पांड्याला केलं किस, Video

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक स्पर्धेतील विजयी मोहिमेला सुरुवात केली. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सामना पाहायला मिळाला. T20 चा हा मजेदार सामना पाहण्यासाठी दुबईचे स्टेडियम खचाखच भरले होते, तर दूरचित्रवाणीसमोरही चाहते थिजून गेले होते. सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक ओनीरने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एक अफगाणी चाहता भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) भारतासाठी विजयी शॉट मारताच व्हिडिओमध्ये उपस्थित लोक आनंद साजरा करण्यास सुरुवात करतात. यातच एक व्यक्ती येतो आणि टीव्हीवर दिसत असलेल्या हार्दिकच्या चेहऱ्याचे चुंबन घेतो.' अशातच ओनीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत एका व्यक्तीने लिहिले की, 'आमच्या सर्व बांधवांचे अभिनंदन. भारत (India) आणि अफगाणिस्तान. आम्ही अफगाणिस्तानचे (Afghanistan) लोक आमच्या शेजारी देशासोबत विजय साजरा करत आहोत.' ओनीरने हा व्हिडीओ हार्ट इमोजीसह शेअर केला आहे. असो, या खेळाबद्दलच्या अशा भावना सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. हा व्हिडीओ देखील याचेच एक उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT