AFC Champions League Impressions of FC Goa novices The instructor rejoiced
AFC Champions League Impressions of FC Goa novices The instructor rejoiced 
क्रीडा

AFC Champions League: एफसी गोवाच्या नवोदितांची छाप; प्रशिक्षक आनंदित

दैनिक गोमंतक

पणजी : एफसी गोवाच्या नवोदित खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खेळताना छाप पाडली याचाच जास्त आनंद आहे, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग (AFC Champions League) स्पर्धेतील, तसेच मोसमातील संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना सांगितले.

एफसी गोवाचे प्रशिक्षक या नात्याने पहिल्या मोसमाविषयी फेरांडो (Fernando) म्हणाले, ``आशियाई फुटबॉलशी जुळवून घेण्याचे नवे आव्हान होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर नवोदित स्पर्धा करू शकले आणि सांघिक पातळीवर एकत्रितपणे, एकमेकांना सहकार्य करत आणि समूह या नात्याने मेहनत घेत कामगिरी बजावू शकलो याचाच जास्त आनंद आहे.`` (AFC Champions League Impressions of FC Goa novices The instructor rejoiced)

40 वर्षीय स्पॅनिश फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने 2020-21 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, मुंबई सिटीविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर माघार घ्यावी लागल्याने गोव्यातील संघास अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यानंतर गोव्यात झालेल्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटात सहापैकी तीन सामने बरोबरीत राखत तिसरा क्रमांक मिळविण्याची किमया साधली.

आव्हानात्मक मोसम

``महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नव्या आव्हाने स्वीकारावी लागली, वैयक्तिक पातळीवर या मोसमात खूप गोष्टी शिकता आल्या,`` असे फेरांडो यांनी भारतातील आपल्या पहिल्या मोसमाविषयी सांगितले. कोरोना विषाणू महामारीमुळे फुटबॉल मोसम जैवसुरक्षा वातावरणात (बायो-बबल) खेळला गेला. ``बायो-बबलमुळे खेळाडूंना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागले, मानसिकदृष्ट्या हा कालावधीत खूपच आव्हानात्मक होता आणि त्याची आम्हाला सवय नव्हती. त्यामुळे सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना प्रोत्साहित करत राहणे मला खूपच कठीण जात होते,`` अशी कबुली फेरांडो यांनी दिली. त्याचवेळी संघ या नात्याने आमची सर्वोत्तम बाजू प्रदर्शित करण्यासाठी काम करण्याची इच्छा कोविडमुळे कमी होऊ शकली नाही, असेही फेरांडो यांनी ठासून सांगितले.

एफसी गोवाची मोसमातील कामगिरी

- स्पर्धा : इंडियन सुपर लीग व एएफसी चँपियन्स लीग

- सामने : 28, विजय : 7, बरोबरी : 15, पराभव : 6

- गोल नोंदविले : 35, गोल स्वीकारले : 34

- आयएसएल स्पर्धेत उपांत्य फेरीत

- एएफसी चँपियन्स लीग पदार्पणात ई गटात तिसरा क्रमांक

- आयएसएलमध्ये सलग 15 सामने अपराजित, 5 विजय, 10 बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT