Abhishek Verma  Dainik Gomantak
क्रीडा

Archery World Cup Stage 3: अभिषेक वर्माने जिंकले 'सुवर्ण', अंतिम फेरीत अमेरिकन तिरंदाजाला चारली धूळ!

Archery World Cup Stage 3: तिरंदाजी विश्वचषक स्टेज III च्या पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत अभिषेक वर्माने सुवर्णपदक जिंकले आहे.

Manish Jadhav

Archery World Cup Stage 3: तिरंदाजी विश्वचषक स्टेज III च्या पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत अभिषेक वर्माने सुवर्णपदक जिंकले आहे. इंचियोन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक आणि वैयक्तिक रौप्यपदक विजेत्या 33 वर्षीय वर्माने शनिवारी अंतिम फेरीत अमेरिकेच्या जेम्स लुट्झचा 148-146 असा पराभव केला.

भारताने तिसरे सुवर्ण जिंकले

विश्वचषक सुवर्णपदक विजेत्या वर्माने पहिल्या दोन टप्प्यातील निराशाजनक कामगिरीनंतर शानदार पुनरागमन केले. याआधी त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित नेदरलँड्सच्या (Netherlands) माईक क्लोसरचा पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यानंतर, आठव्या मानांकित वर्माने शेवटच्या चार लढतीत ब्राझीलच्या लुकास अॅब्रेउचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

अभिषेकचे हे तिसरे वैयक्तिक पदक आहे

दुसरीकडे, वर्माचे हे तिसरे वैयक्तिक विश्वचषक सुवर्णपदक आहे. 2021 च्या पॅरिस स्टेजनंतर हे त्याचे पहिले सुवर्ण आहे. त्याने 2015 मध्ये पोलंडमधील व्रोकला येथे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. त्याने विश्वचषकाच्या वैयक्तिक प्रकारात दोन रौप्य आणि एक कांस्यपदकही पटकावले आहे.

भारताने आतापर्यंत 4 पदके जिंकली आहेत

भारतीय संघाने चालू स्पर्धेत आतापर्यंत एक सुवर्ण आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत. रिकर्व्ह मिश्र संघही रविवारी कांस्यपदकासाठी लढणार आहे. संघाने फ्रान्स (France) आणि नेदरलँड्सचा समान 6-0 फरकाने पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांना कोरियाविरुद्ध 3-5 ने पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकासाठी चायनीज संघ तैपेईशी भिडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT