Hardik and Krunal Pandya Dainik Gomantak
क्रीडा

पंड्या कुटुंबासाठी स्पेशल मोमेंट! GT vs LSG मॅचआधी हार्दिक - कृणालचा 'ब्रोमान्स', पाहा Video

आयपीएल २०२३ मध्ये ७ मे रोजी हार्दिक आणि कृणाल हे सख्खे भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Pranali Kodre

Hardik and Krunal Pandya in IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी ५१ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना दोन खेळाडूंसाठी खूप खास आहे. हे दोन खेळाडू म्हणजे कृणाल आणि हार्दिक पंड्या.

कृणाल लखनऊ संघाचे आणि हार्दिक गुजरात संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्यामुळे पंड्या कुटुंबासाठी हा सामना विशेष ठरला. त्यामुळे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये असे घडले आहे की दोन सख्खे भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. तसेच आयपीएलमध्ये नेतृत्व करणारीही त्यांची पहिलीच भावांची जोडी ठरली आहे.

दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्याआधी या दोन्ही भावांनी एकत्र काही वेळ एकत्र घालवला. त्यांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की हार्दिक आणि कृणाल एकमेकांशी बोलत आहेत. तसेच हार्दिक कृणालची कॉलर नीट करताना आणि टोपीही नीट घातलाना दिसत आहे.

या सामन्याची नाणेफेक झाल्यानंतर कृणाल म्हणाला, 'आमच्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे, की आम्ही आपापल्या संघांचे नेतृत्व करत आहोत.' त्याचबरोबर हार्दिक म्हणाला, 'हा खूप भावनिक दिवस आहे. आमच्या वडिलांनाही खूप अभिमान वाटत असेल. हे असे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाला अभिमान वाटत आहे. आज एक पंड्या नक्कीच जिंकेल.'

खरंतर कृणाल आणि हार्दिक २०२१ पर्यंत एकत्र मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळले होते. पण नंतर २०२२ मध्ये हार्दिक गुजरात संघात गेला आणि त्याला या संघाचा कर्णधारही नेमण्यात आले. तसेच कृणालला लखनऊने संघात घेतले.

खरंतर लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुल आहे. पण केएल राहुल १ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला आणि या आयपीएल २०२३ हंगामातून बाहेर झाला. त्याचमुळे कृणालला लखनऊचे कर्णधारपद सोपवण्यात आले.

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

  • लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT