Goa Chess committee  Dainik Gomantak
क्रीडा

गोवा बुद्धिबळात येणार अस्थायी समिती

राज्य संघटना निवडणूक प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी ः गोवा बुद्धिबळ संघटनेची निवडणूक न्यायप्रविष्ट आहे, त्या पार्श्वभूमीवर नवे पदाधिकारी ताबा घेईपर्यंत संघटनेच्या प्रशासकीय कामकाजासाठी अस्थायी समिती नियुक्त करण्याचे स्वातंत्र्य दिल्ली उच्च न्यायालयाने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाला दिले आहे.

नवी दिल्ली येथील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव यांनी गोवा बुद्धिबळ संघटनाप्रकरणी किशोर बांदेकर व इतर विरुद्ध महेश कांदोळकर व इतर यांच्या सुनावणीवर 22 फेब्रुवारी रोजी आदेश दिला. 

न्यायालयाने (court) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने अर्ज सादर केला होता. त्याअनुषंगाने महासंघाची केंद्रीय समिती गोवा राज्यातील बुद्धिबळ खेळाचे प्रशासन पाहण्यासाठी पाच सदस्यीय अस्थायी समिती नियुक्त करण्यास मुक्त असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी या वर्षी 14 जुलै रोजी होईल.

तेंडुलकर, बांदेकर गटाला धक्का

दिल्ली उच्च न्यायालयाने अस्थायी समिती नियुक्तीसंदर्भात दिलेला आदेश हा गोवा बुद्धिबळ (Chess) संघटनेचे माजी पदाधिकारी खासदार विनय तेंडुलकर व सचिव किशोर बांदेकर यांना मोठा धक्का मानला जातो. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी निवडणूक प्रक्रियेत घोळ घातल्यानंतर महेश कांदोळकर, आशेष केणी, विश्वास पिळर्णकर व अमोघ नमशीकर या निवडणुकीतील उमेदवारांनी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे दाद मागितली होती.

यानंतर आयोगाने नव्याने निवडणूक (Election) घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर किशोर बांदेकर व इतरांनी चार जागांसाठी नव्याने निवडणूक घेण्याच्या नैतिकता आयोगाच्या आदेशाविरोधात महासंघाच्या अपील समितीकडे केलेले अपील फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT