Fans of Kerala Blasters News, Kerala Blasters News Dainik Gomantak
क्रीडा

Kerala Blasters : केरळा ब्लास्टर्सच्या दोघा चाहत्यांचा भीषण अपघातात मृत्यू

केरळा ब्लास्टर्स संघाकडून सोशल मीडियाद्वारे तीव्र दुःख व्यक्त करुन श्रद्धांजली

दैनिक गोमन्तक

पणजी : आयएसएलच्या अंतिम सामन्यासाठी केरळहून दुचाकीवरून गोव्याला निघालेल्या केरळा ब्लास्टर्सच्या दोघा युवा चाहत्यांचे रविवारी सकाळी अपघाती निधन झाले. ए. के. शिबिल (20) व पी. टी. मुहम्मद जमशिर (22) हे मल्लपुरम शहरानजीकच्या चेरुकुन्नू गावातील दोघे युवक मडगाव येण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. (Fans of Kerala Blasters News)

केरळमधील कासारागोड जिल्हातील उदमा येथे त्यांच्या दुचाकीला मिनी ट्रकची धडक (Accident) बसली. इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिबिल हा हैदराबाद एफसीचा विंगर ए. के. अब्दुल राबीह याचा नातेवाईक आहे. दोघा युवा चाहत्यांच्या अपघाती निधनाबद्दल केरळा ब्लास्टर्स संघाने सोशल मीडियाद्वारे तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान केरळमधून मोठ्या संख्येने केरळा ब्लास्टर्सचे (Kerala Blasters) पाठिराखे रविवारी फातोर्ड्यात दाखल झाले. हा संघ यलो जर्सीसाठी ओळखला जातो. त्यामुळे नेहरू स्टेडियमवर संघाच्या चाहत्यामुळे पिवळी लाट उसळलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात सामन्यात केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू अवे सामना असल्याने काळ्या, तर हैदराबादचे खेळाडू (Hyderabad FC) यलो जर्सीत खेळले. अधिकृत आकडेवारीनुसार पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 11,500 उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT