मेकअपमन बनलेला पेंटर! Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मेकअपमन बनलेला पेंटर!

आताची पिढी नाटकं गंभीरपणे घेते. रंगभूषाकाराला आजच्या काळात सन्मान आहे. सुरुवातीच्या काळात नाटकवाल्यांसाठी आपण ‘पेंटर’ (Painter)होतो. आता ‘मेकअपमन’ (Makeupman)बनलो आहे.

दैनिक गोमन्तक

आहार्य अभिनय हा अभिनयाचा एक प्रकार आहे ज्यात वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य(Costumes, costumes, backstage) इत्यादींचा वापर करून नट स्वतःच्या व्यक्तिरेखेला अभिव्यक्त करतो. मात्र अनेकदा होते असे की अभिनेत्याच्या अंगिक म्हणजे, त्याने स्वतःचे शरीर वापरून केलेल्या अभिनयालाच ‘अभिनय’ ('Acting')असे समजले जाते.

स्टालिनस्लवास्कीच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्टर प्रिपेअर्स’ (Actor Preparers')मध्ये एक प्रसंग त्याने दिला आहे. एक अभिनेता आपल्या व्यक्तिरेखेच्या शोधार्थ असतो. त्याला त्या व्यक्तिरेखेचे मर्म समजण्यासाठी फार त्रास होत असतो. तो अभिनेता सहज म्हणून रंगपटात जातो. तिथली एक ढगळ पॅन्ट त्याला वैशिष्ट्यपूर्ण वाटते. ती तो आपल्या अंगावर चढवतो. हाताला एक काठी मिळते. ती घेऊन तो फिरवतो आणि अचानक त्याला त्याची व्यक्तिरेखा सापडून जाते. आपण रंगमंचावर नेमके काय करायचे आहे, कसे वावरायचे आहे याचे नेमके ज्ञान त्याला होते.

रंगमंचावर असलेले नेपथ्य, व्यक्तिरेखेची वेशभूषा, रंगभूषा आपोआपच अभिनेत्याला ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांना समोर मांडायला मदत करते. या साऱ्या आपण अनेकदा ‘दुय्यम’ समजतो त्या गोष्टी व्यक्तिरेखा प्रकट करण्यात आणि नाटकाचा आशय म्हणण्यात अतिशय सहाय्यभूत ठरत असतात. रंगभूषेचे महत्त्व तर वादातीत आहे.

व्यक्तिरेखे व्यतिरिक्त, अभिनेत्याच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश, त्याने केलेली वेशभूषा, नेपथ्याचा रंग या साऱ्यांचा विचार रंगभूषा करताना व्हायला हवा. गोव्याचा एक महत्त्वाचा रंगभूषाकार एकनाथही नेमके हेच करतो. तो जेव्हा नाटकासाठी रंगभूषाकार म्हणून काम करतो, तेव्हा तो नाटकाच्या तालमीत दिग्दर्शकाकडे नाटकाच्या आशया संबंधाने चर्चा करतो, व्यक्तिरेखांची जडणघडण समजून घेतो, याच करण्यासाठीच गोव्यातील अनेक नाट्यसंस्थाना एकनाथ आपला रंगभूषाकार म्हणून हवा असतो.

एकनाथ नाईकच्या (Eknath Naik)नाट्य प्रवासाची सुरुवात एक अभिनेता म्हणून झाली (कदाचित रंगभूषाकार म्हणून याचाही फायदा त्याला होत असेल) पण नंतर त्याने रंगभुषा हेच आपले कार्यक्षेत्र बनवले. नाटकांमधल्या ‘रंगभूषाकार’ म्हणून आपल्या कामाचं महत्त्व तो पुरेपूर जाणतो त्यामुळे तो एखाद्या अभिनेत्याप्रमाणेच तो रंगभूषा करत असलेल्या नाटकाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. गेल्या काही वर्षात रंगमंचावरील लाइट्स मध्ये बदल झालेला आहे. ‘हॅलोजन’ जाऊन ‘एलईडी’ लाइट्स आलेल्या आहेत. पिवळा प्रकाश पांढरा बनलेला आहे.

त्यामुळे एकनाथ म्हणतो, तो वापरत असलेल्या फाऊंडेशनच्या रंगातही बदल झालेला आहे. आता तो बिनदिक्कतपणे ‘ईज्प्शिअन’ टोन ( जो काळसर-गव्हाळी वर्णाबरोबर जातो) वापरू शकतो जो हॅलोजनच्या प्रकाशात वापरणे जोखमीचे असायचे. (अशा तर्हेने तो बदलणाऱ्या काळाची बूज राखतो). एकनाथ नाईकने रंगभूषेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांने त्या संबंधातल्या बऱ्याच कार्यशाळांना हजेरी हजेरी लावली आहे. सुप्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे त्यांच्या एका कार्यशाळेत सुद्धा त्याने प्रशिक्षण घेतले आहे. पण तो म्हणतो, आपण अनुभवातून अधिकाधिक शिकत गेलो आहे.

वेळ असेल तेव्हा तो स्वतःच्या आईचा मेकअप देखील करायचा. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तिच्या चेहऱ्यावर आजमावून पाहायचा. त्याची आईदेखील खूप हौस बाळगणारी होती. एकदा तर तिची रंगभूषा करताना एकनाथने तिच्या केसांचा चक्क बॅाबकट केला होता. रंगभूषाकार म्हणून नाटकांच्या मोसमात कार्यमग्न असणारा एकनाथ या कोरोनाकाळानंतर नाटक पुन्हा कधी सुरू होईल याची वाट पाहतो आहे. तो म्हणतो, आताची पिढी नाटकं गंभीरपणे घेते. रंगभूषाकाराला आजच्या काळात सन्मान आहे. सुरुवातीच्या काळात नाटकवाल्यांसाठी आपण ‘पेंटर’ होतो. आता ‘मेकअपमन’ बनलो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT