Worship of Shiva Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Worship of Shiva: तुम्ही जर सोमव्रत करत आहात तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा..

Ganeshprasad Gogate

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस देवतेला समर्पित असतो. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्यास भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात,असा दृढ विश्वास आहे. आख्यायिकेनुसार, चंद्रदेवाने या दिवशी (सोमवारी) महादेवांची पूजा करून मुक्ती मिळवली. म्हणूनच सोमवार हा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. शिव खूप दयाळू आहे. असे मानले जाते की जर शिव तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

निस्सीम शिवभक्त सोमवारी शिवाची पूजा करून उपवास करतात. काहीजण भगवान महादेवाला ठराविक संख्येने बेलपत्र वाहण्याचा संकल्प करतात. सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. मात्र, जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे.

सोमवार हा भगवान शंकराचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी नियमानुसार भोलेनाथाची पूजा करून आणि उपवास करून ते प्रसन्न होतात. असे मानले जाते की सोमवारी भगवान शंकराची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते. परंतु, सोमव्रतामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

सोमव्रताचे काही नियम-

• या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे, त्यानंतर शिवलिंगासमोर सात्विक भावनेने बसून षोडशोपचार पूजा करावी.

• जलाभिषेक करताना भांड्यातील पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे.

• शिवाला चमेलीचे फूल अर्पण करावे, असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

• पूजेनंतर शिवलिंगाजवळ दिवा कायम प्रज्ज्वलित ठेवावा.

• आरतीनंतर मंदिराची प्रदक्षिणा करावी, परंतु लक्षात ठेवा की प्रदक्षिणा पूर्ण करू नका, शिवलिंगाचे दूध जेथे वाहते तेथे थांबा आणि मागे वळा आणि उलट्या दिशेने प्रदक्षिणा पूर्ण करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT