World TB Day 2022, Tb symptoms in Marathi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World TB Day: टीबीच्या 'या' सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

TB हा एक संसर्गजन्य आजार आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. जगभरात लाखों लोक टीबी आजाराशी झुंज देत आहेत. हा एक गंभीर संसर्गजन्य आजार असून फुफ्फुसावर याचा परिणाम होतो. हळूहळू ते मेंदू आणि मणक्यासारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाच्या जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे (World TB Day 2022)

टीबीचे सामान्य लक्षणे (Tb symptoms)

* टीबीच्या सर्वात सामान्य लक्षणापैकी एक खोकला आहे जो दीर्घकाळ टिकतो. हे 2-3 आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकते. टीबीमध्ये (TB) येणारा खोकला कोरडा नसतो आणि त्यातून लाळ बाहेर निघते.

* खोकल्यासह रक्त बाहेर येणे

* श्वास घेतांना छातीत दुखणे

* वजन कमी होणे

* लवकर थकवा येणे

* ताप येणे

* रात्री झोपेत घाम येणे

* खूप थंडी वाजणे

* भूक न लागणे हे टीबीचे एक सामान्य लक्षण आहे.

* कोणत्या लोकांना जास्त धोका

तुमच्या मित्राला किंवा सहकाऱ्याला टीबी असल्यास, तुम्हालाही संसर्ग होण्याची शक्यता असते. रशिया, आफ्रिका, पूर्व युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन यासारख्या भागात राहिल्यास किंवा प्रवास केलेल्या लोकांना टीबी होण्याची शक्यता जास्त असते कारण येथे टीबी हा आजार सामान्य आहे. एचआयव्हीची लागण झालेले लोक, तुरुंगात राहणारे लोक किंवा इतर आजार असणाऱ्या लोकांना हा आजार होऊ शकते. या आजारवर उपचार करणारे लोक सुद्धा या आजाराला बळी पडतात. धूम्रपान करणाऱ्या लोकांना टीबीचा नेहमीच धोका असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT