World Milk Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Milk Day: रोज एक ग्लास दूध वाढवेल तुमची स्मरणशक्ती

दरवर्षी १ जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच दूध पिणे आरोग्यासाठी फादेशीर मानले जाते.

Puja Bonkile

World Milk Day 2023: दरवर्षी 1 जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक गटक असतात.यामुळे शरीराच्या विकासासाठी मदत करतात.

दररोज एक ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही. योग्य प्रमाणात प्रथिने, पोटॅशियम, आयोडीन शरीराला मिळते.

  • हाडांसाठी फायदेशीर

दूध पिणे हाडांसाठी तसेच दातांसाठी खूप फायदेशीर आहे. तेसच दूध पिणे आपल्या मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. दुधाला संपूर्ण अन्न देखील म्हटले जाते.कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

  • स्मरणशक्ती सुधारते

दुधात असणारे पोषक घटक, विशेषत: ब जीवनसत्त्वे आणि प्रथिने मेंदूसाठी खूप महत्त्वाची असतात. हे दोन्ही पोषक घटक स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी निरोगी मेंदूच्या पेशी राखण्यास मदत करते आणि स्मृती निर्मितीसाठी न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करते.

  • मुलांमध्ये मेंदूचा विकास करण्यासाठी फायदेशीर

बालपण आणि पौगंडावस्थेतील दुधाचे सेवन केल्यास शरीराचा योग्य विकास होतो. दुधातील कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी आणि बी12 तरुणांच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात.

  • लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदेशीर

दुधामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक तत्वांचे मिश्रण मेंदूला सतत ऊर्जा प्रदान करते. ज्यामुळे सतत एकाग्रता आणि लक्ष केंद्रित होते. दररोज नाश्ता किंवा दुपारच्या वेळी योग्य प्रमाणात दूध प्यायल्याने लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.

  • एनर्जी बूस्टर

दुधात भरपूर प्रथिने असतात. म्हणूनच दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज रात्री एक ग्लास गरम दूध प्यायल्याने दुसऱ्या दिवशी एनर्जी राहते. त्याचबरोबर दूध प्यायल्याने स्नायूंचा विकास होण्यासही मदत होते.

  • झोपेची कमतरता राहणार नाही

रात्री झोपतांना एक ग्लास कोमट दूध प्यावे, ते शरीर आणि मनाला प्रचंड आराम देते. असे केल्याने झोपेची गुणवत्ता चांगली राहते ज्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही.

milk
  • आहारात समाविष्ट कसे करावे?

तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास दुधाने करा. जर तुम्ही तुमच्या कॅलरीजच्या सेवनाकडे लक्ष देत असाल तर कमी फॅट किंवा नॉन फॅट दूध प्या. तुम्ही पर्यायी दुग्धजन्य पदार्थांना प्राधान्य देत असल्यास, तुमच्या आहारात (Diet) दही आणि पनीरचा समावेश करा. यामुळे तुमच्या मेंदूच्या विकासाचाही फायदा होतो. उन्हाळ्यात (Summer) तुम्ही स्मूदी ड्रिंक म्हणून दूध पिऊ शकता.

  • मधुमेहामध्ये फायदेशीर

रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे असे करणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि त्यांचे आरोग्य (Health) चांगले राहते.

  • थकवा दूर करते

आजच्या काळात लोक कामात इतके व्यस्त झाले आहेत की ते स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. थकवा आणि चिडचिड होत असेल तर गरम दुधाचे सेवन करावे.

  • या पदार्थांसह दूधाचे सेवन टाळावे

  1. केळी

  2. मासे

  3. फळं

  4. मुळा

  5. आंबट आणि आम्लयुक्त पदार्थ

    (Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT