World Mental Health Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Mental Health Day: तुम्हीही 'या' 4 समस्यांनी त्रस्त असाल तर तुमचे मानसिक आरोग्य आहे धोक्यात! वेळीच व्हा सावध

अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता खूप वाढली आहे

Kavya Powar

World Mental Health Day 2023: निरोगी जीवन जगण्यासाठी, आपण शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. यामुळेच अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता खूप वाढली आहे.

पण असे काही लोक आहेत जे मानसिक समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र, त्यांना याची जाणीवही नसल्याने हा त्रास वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला येथे काही गोष्टी सांगत आहोत.

जर त्या चार गोष्टी तुमच्यामध्ये असतील किंवा तुम्हाला असे वाटत असेल तर समजा तुमचे मानसिक आरोग्य चांगले नाही. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसण्याची चिन्हे

1. जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य ठीक आहे की नाही हे तपासायचे असेल, तर स्वतःला विचारा की तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे का? जेंव्हा तुम्ही एकटे बसता तेंव्हा पैसा कुठून येईल याचा विचार तुम्ही करता का?

पैसे कोणाला परत करायचे आहेत का? किंवा अधिक पैसे कसे कमवायचे? जर तुम्ही असा विचार करत असाल तर समजा तुमचे मानसिक आरोग्य चांगले नाही. कारण जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर नसता तेव्हा तुम्हाला मानसिक तणाव किंवा समस्या येतात.

2. काहीवेळा अत्याधिक आरोग्याविषयी जागरुक असणे हे तुमच्या मानसिक आरोग्याची खराब स्थिती दर्शवते. अशा परिस्थितीत, तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की तुम्हीही तुमच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहात का? तरीही तुम्हाला उत्तर मिळाले नाही, तर तुमच्या दैनंदिन वेळापत्रकाकडे लक्ष द्या.

जर तुम्ही जास्त स्वत:ची काळजी घेत असाल, जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा स्वत:ला ओव्हरबूस्ट करत असाल तर समजून घ्या की तुम्ही खूप काळजीत आहात. हे खराब मानसिक आरोग्याचे लक्षण आहे.

3. स्वतःसाठी वेळ काढणे देखील महत्वाचे आहे. स्वतःशी बोलणे आणि आपल्या छंदांना जागा देणे महत्वाचे आहे. पण दिवसातून एक तास सुद्धा जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत नसाल तर ते योग्य नाही. कारण असे घडते जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसता आणि तुमच्यावर कामाचे खूप दडपण असते.

4. जर तुम्ही असाही विचार करत असाल की तुमचे सध्याचे आयुष्य तुमच्या पूर्वीच्या आयुष्याइतके चांगले नाही, तर समजून घ्या की तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही.

जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत बोलून मन मोकळे करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT