Periods Pain  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Periods Pain: पिरेड्समधील वेदना असू शकतात गंभीर आजारांचे कारण

प्रत्येक महिलेला पिरेड्समध्ये जास्त तर काहींना कमी वेदना होतात. असे का होते जाणून घेऊया यामागील कारण

Puja Bonkile

Women Health: पिरेड्स दरम्यान वेदना किंवा हात-पायमध्ये क्रॅम्प येणे सामान्य समस्या आहे. ही समस्या कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक महिलांना जाणवते. पण जर एखाद्या महिलेला पिरेड्स दरम्यान दर महिन्याला खुप वेदना होत असेल तर एका गंभार आजाराचे लक्षण असू शकते. यामुळे महिलांना या काळात आपली काळजी घेणे गरजेचे असते.

  • पिरेड्समध्ये अतिवेदना होणे आरोग्यासाठी घातक

पीरियड्समध्ये वेदना होणे हे सामान्य आहे. पण खुप जास्त वेदना होणे हे महिलांसाठी सामान्य नाही. पीरियड्स दरम्यान क्रॅम्प आणि वेदना होणे आरोग्यासाठी योग्य मानले जात नाहीत. शरिरात जास्त वेदना होणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.म्हणूनच आपल्याला पिरेड्समध्ये होणाऱ्या वेदनाबद्दल सर्व काही माहित असणे आवश्यक आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पीरियड्स दरम्यान अंडाशय फुटतो. या दरम्यान काही वेदना होऊ शकतात. पिरेड्स दरम्यान काही वेदना होणे हे सामान्य असले तरी अशा वेदनांमुळे तुम्हाला कामावर लक्ष देता येत नसेल तर ही एक मोठी समस्या आहे. याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधून उपाय केला पाहिजे.

  • पीरियड वेदना एका दिवसापेक्षा जास्त दिवस होणे सामान्य नाही

पिरेड्स दरम्यान काही वेदना आणि क्रॅम्प्सचा एक दिवस त्रास होतो. एक दिवस त्रास होणे हे सामान्य आहे. पण या वेदना जर दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस होत असेल तर तुम्ही दैनंदिन जावनातील कामे सहज करू शकत नाही. कारण या वेदना वाढत जातात.

  • पिरेड्समध्ये वेदना का होतात

एन्डोमेट्रिओसिस ,मायोमस, तांब्यापासून बनलेले इन्ट्रायुटेरियन डिव्हाईस (IUD) म्हणजेच गर्भाशयात घातले जाणारे उपकरण, पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज (PID), मासिक पाळीपूर्व सिंड्रोम (PMS), शारिरिकसंबंधा दरम्यान संक्रमित होणारा संसर्ग या कारणांमुळे वेदना होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT