Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. कोरड्या आणि थंड वाऱ्यामुळे त्वचेला कोरडेपणा आणि खाज सुटते. त्यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून वाचवणे गरजेचे आहे. यासाठी काही टिप्स फॉलो करून तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचेला मुलायम ठेऊ शकता.
मॉइश्चरायझर लावावे
हिवाळ्यात तुम्ही जेव्हाही हात, पाय किंवा चेहरा धुता तेव्हा त्वचेवरील नैसर्गिक तेल निघुण जाते. हे तेल ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. म्हणून जेव्हा तुम्ही तुमची त्वचा धुता तेव्हा लगेच मॉइश्चरायझर वापरावे. त्यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो. तसेच खाज सुटण्याची समस्या कमी होते.
सनस्क्रीनचा वापर
हिवाळ्यात सुद्धा सुर्यांच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. कारण त्यामुळे त्वचेची आर्द्रता नष्ट करू शकतात. जेव्हाही तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझ लावावे
झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ लावावे. तुम्ही अल्ट्रा हायड्रेटिंग लोशनसह शिया बटर, जोजोबा तेल वापरू शकता. रात्री मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा ते चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि ओलावा टिकून राहतो. यामुळे तुमची त्वचा दिवसभर मऊ राहते. यामुळे खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
खुप गरम पाण्याने आंघोळ
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे हा एक वेगळाच आनंद असतो. पण जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. हिवाळ्यात आंघोळीच्या वेळी पाण्यात दोन ते तीन थेंब तेल मिक्स करावे. यामुळे त्वचेवरील खाज दूर होईल आणि तेल त्वचेला आर्द्रता देईल.
भरपुर पाणी प्यावे
हिवाळ्यात देखील भरपुर पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील आणि खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.