Decoration Ideas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Decoration Ideas: हिवाळ्यात घरातील 'हे' बदल आणतील सकारात्मकता

हिवाळ्यात आपण सर्वजण आपल्या घराच्या सजावटीत काही ना काही बदल करतो.

Puja Bonkile

जेव्हा हवामान बदलते तेव्हा केवळ आपल्या कपड्यांची स्टाइलच बदलत नाही तर आपल्या घराचे स्वरूप देखील बदलते. अनेक लोकांना ऋतूनुसार घर सजवायला आवडते. जसे की हिवाळ्यात आपण घराच्या सजावटीत असे बदल करतो की त्यामुळे घरात उबदारपणाची भावना येते.

घर सजवताना लोक वैयक्तिक स्पर्श जोडतात असे अनेकदा दिसून येते. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ते ऋतूनुसार घर सजवतात. पण या दिवसांमध्ये वास्तुच्या काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर घरामध्ये सकारात्मकताही येते. या टिप्स कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

पोस्टर दक्षिण दिशेला लावा

जेव्हा तुम्ही हिवाळ्यात तुमचे घर सजवत असाल, तेव्हा दक्षिण दिशेला अशी पोस्टर्स लावावीत, की ज्यामुळे उबदारपणाचा जाणवेल. तुम्ही येथे कोणत्याही प्रकारचे ज्योत किंवा शेकोटीचे पोस्टर लावू शकता. जर तुमचे घर खूप मोठे असेल आणि तुम्हाला हिवाळ्यातही घरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी शेकोटी लावायची असेल, तर यासाठी मध्य किंवा दक्षिण-पूर्व दिशा खूप चांगली मानली जाते. यामुळे घरात सकारात्मकता येते.

हॉलमध्ये झाड लावणे

हिवाळ्यात लोकांचा मूड खूपच नकारात्मक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. लोक बराच वेळ घरातच राहतात आणि अशावेळी त्यांच्यामध्ये नकारात्मकता येऊ लागते. त्यामुळे तुमच्या घराच्या लॉबीमध्ये किंवा ड्रॉईंग रूममध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक रोपे लावावे. यामुळे तुमचा मूडही सुधारतो आणि घरात सकारात्मकता येते. पण रोप लावताना लक्षात ठेवा की त्यात निवडुंग, बोन्साय किंवा दुधाळ वनस्पती जसे की रबर प्लांट इत्यादींचा वापर करू नका. जर तुम्ही नैसर्गिक वनस्पती तिथे ठेवू शकत नसाल तर कृत्रिम रोपे देखील वापरता येतील. परंतु नैसर्गिक वनस्पती ठेवणे चांगले मानले जाते.

फर्निचर बदलणे

हवामान बदलले की काही लोक आपले फर्निचरही बदलण्याचा निर्णय घेतात. तुम्हीही यावेळी असेच काही करायचे ठरवले असेल तर घरात जास्तीत जास्त लाकडी फर्निचर वापरण्याचा प्रयत्न करा. ऋतूनुसार ते थंड किंवा गरम नसते. एवढेच नाही तर घरात सकारात्मकताही येते.

कार्पेट टाकणे

थंडीच्या दिवसात लोक आपल्या घराच्या सजावटीत गालिचा नक्कीच वापरतात. हे त्यांना त्यांच्या घरात उबदार ठेवण्यास मदत करते. तुम्हीही असेच करत असाल तर ते सांभाळणे खूप गरजेचे आहे. त्यात धूळ आणि बॅक्टेरिया जमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे झाल्यास वास्तूनुसार ते अत्यंत नकारात्मक मानले जाते. एवढेच नाही तर घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT