Dandruff: हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. हिवाळ्यात आरोग्यासह केसांसंबंधित समस्या देखील निर्माण होतात. अनेक लोकांना हिवाळ्यात कोंड्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण त्याचा वापर करून देखील कोंड्याचा त्रास कमी होत नाही. या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.
कोरफड
कोरफड आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरते. तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही कोरफड वापरू शकता. कोरफडमध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म कोंडा कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोरफड केसांच्या मुळात लावावे. यामुळे केसांची चमक कायम राहते.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे केसांमधील कोंड्यांची समस्या कमी होऊ शकते. लिंबाचा रस आठवड्यातून २ किंवा ३ वेळा लावु शकता. तुम्ही लिंबाचा रस खोबरेल तेलात मिक्स करून लावू शकता. ते केसांना लावल्याने केसांना हायड्रेट ठेवते आणि कोंडा कमी होतो. कोंडा कमी करण्यासाठी हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
खोबरेल तेल
खोबरेल तेल केसांसाठी फायदेशीर असते. तुम्हाला जर कोंड्याची समस्या कमी करायची असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. तसेच केसांमध्ये चमक कायम राहते. यासाठी तेल थोडे कोमट करावे आणि केसांच्या मुळात मसाज करावी.
दही
दही आरोग्यासह केसांसाठी देखील फायदेशीर असते. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. हे घटक केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात. यासाठी फ्रेश दही केसांच्या मुळात लावावे. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ केस धुवावे. यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.
कडुलिंबाचे पाणी
कडुलिंबाच्या पानांचा वापर करून तुम्ही कोंड्याची समस्या कमी करू शकता. यासाटी कडुलिंबाच्या पानांना उकळावे नंतर थंड करावे नंतर त्या पाण्यात दही मिक्स कारवे आणि केसांच्या मुळात लावावे. नंतर शॅम्पु करून स्वच्छ पाण्याने केश धुवावे. हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.