Wi-Fi Disadvantages: आजकाल स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांशिवाय आपण जगू शकत नाही अशी स्थिती झाली आहे. वाय-फाय ही एक अशी सेवा आहे, जी आपल्याला 24X7 इंटरनेट उपलब्ध करुन देते. इंटरनेटशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची डिजिटल अॅक्टिविटी करता येत नाही.
आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये वाय-फाय कनेक्शन असेलच. वाय-फायसाठी घरात एक राउटर देखील बसवलेला असतो, जे वाय-फाय म्हणजेच इंटरनेट प्रदान करणारे एक मशीन आहे. सामान्यतः लोक हे मशीन बंद करत नाहीत कारण आपल्याला सतत इंटरनेटची आवश्यकता असते. लोक सहसा रात्री फिल्म किंवा सीरियल पाहण्याचा आनंद घेतात. यामुळे वाय-फाय मशीन रात्रभर चालू राहते, पण तुम्हाला माहिती आहे का की, राउटर चालू ठेवणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे? जर नसेल तर हा रिपोर्ट नक्की वाचा.
रात्रभर वाय-फाय राउटर चालू ठेवल्याने काही लहरी, म्हणजेच रेडिएशन वेव्स बाहेर पडतात, ज्या आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. नॅशनल हेल्थ लायब्ररीमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, एका संशोधनात, 34 वर्षे वयोगटातील 5 व्यक्तींनी वाय-फाय राउटरजवळ 5 रात्री घालवल्या. इंटरनेट (Internet) एक्सपोजरमध्ये इतका वेळ घालवल्यानंतर, त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर काही परिणाम दिसून आला.
1. स्लीपिंग प्रॉब्लम्स - वाय-फायमधून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे स्लीपिंग प्रॉब्लम्स सारख्या समस्या उद्भवू शकतात.
2. मेंदूवर परिणाम - जर वाय-फायमधून निघणारे रेडिएशन आपल्या मेंदूशी कनेक्ट राहिले तर त्याचा मेंदूवर परिणाम होतो आणि त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मानसिक ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
3. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारे रेडिएशन – हेल्थ रिपोर्टनुसार, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि वाय-फाय नेटवर्कशी जोडलेल्या इतर उपकरणांमधून निघणाऱ्या मॅग्नेटिक वेव्स देखील आपल्या आरोग्याला (Health) हानी पोहोचवू शकतात. याचा परिणाम उच्च रक्तदाब, हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो.
1. रात्री झोपताना राउटर बंद करण्याची सवय लावा.
2. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर रात्री इंटरनेट बंद करा.
3. तुमच्या बेडरुम किंवा झोपण्याच्या जागेपासून वाय-फाय राउटर दूर बसवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.