National Parents Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

National Parents Day का साजरा केला जातो? आई-वडीलांचा आठवण व्हावी म्हणून?

आईवडील आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम असते.

दैनिक गोमन्तक

National Parent's Day: या पृथ्वीतलावर आई-वडिलांना देवाचे दुसरे रूप मानले जाते. आईवडील आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम असते. पालकांच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी दरवर्षी पालक दिन साजरा केला जातो. मात्र हा पालक दिन कधी सुरू झाला आणि या दिवसाचं काय महत्व आहे ते जाणून घेऊया...

दक्षिण कोरियामध्ये 8 मे 1973 रोजी पालक दिन साजरा करण्यास कधी सुरुवात झाली? मात्र दक्षिण कोरियामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी 8 मे निवडण्यात आला. त्याच वेळी, अमेरिकेत 1994 मध्ये अधिकृतपणे पालक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. जेव्हा हा दिवस साजरा करण्यात आला तेव्हा तो दिवस जुलैचा चौथा रविवार होता. अशा प्रकारे पालक दिन दरवर्षी जुलैच्या चौथ्या रविवारी साजरा केला जाऊ लागला. हा दिवस वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. फिलीपिन्समध्ये डिसेंबरच्या पहिल्या सोमवारी, व्हिएतनाममध्ये 7 जुलै आणि रशिया आणि श्रीलंकेमध्ये 1 जून रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जातो.

पालक दिनाचे महत्त्व

पालक दिन साजरा करण्याचा उद्देश काही वेगळा नाही. पण आपल्या आयुष्यात पालकांचं महत्व काय आहे याचं स्मरण व्हायला हा दिवस साजरा केला जातो. शेवटी आई आणि वडील दोघेही मुलांसाठी एक प्रकारे देवाचे रूपच असतात. फक्त प्रेमाची भावना ठेवत केवळ पालकच मुलांवर सर्वस्व अर्पण करू शकतात. प्रत्येक चांगल्या-वाईट काळात एकत्र उभे राहणे. मुलांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून, आपलं सर्वस्व अर्पन करणारे पालक या जगात आहे. आपलं अस्तित्व विसरून मुलांसाठी जगत राहण्याच धाडस केवळ एक पालकच करू शकतात. आई आणि वडील हे जीवनातील सर्वात मोठे वरदान मानले जाते. त्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. म्हणूनच पालक दिनही साजरा केला जातो.

पालक दिवस सेलिब्रेशन कसा करावा

हा दिवस साजरा करण्यासाठी, आपल्या पालकांना त्यांच्या आवडीची डिश बनवून लंच किंवा डिनरमध्ये एक खास सरप्राईज द्या. तुम्ही त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकता किंवा संपूर्ण कुटुंबासह पिकनिकला जाऊ शकता. ते त्यांना आवश्यक असलेल्या कोणत्याही वस्तू भेट देऊ शकतात. प्रत्येकजण त्यांच्या आवडीचा जुना चित्रपट लावून एकत्र स्नॅक पार्टी करू शकता. या शिवाय आपल्या आवडीनुसारही आपण हा दिवस सेलिब्रेट करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कोजागरी पौर्णिमेला चमकणार 'या' 5 राशींचं नशीब! अचानक मिळू शकते गुड न्यूज, आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Sandalwood Tree: स्वतः झिजून जगाला सुगंध देणारा चंदनवृक्ष! 40 ते 50 वर्षांच्या वाढीमागचं निसर्गाचं अद्भुत रहस्य

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

SCROLL FOR NEXT