Dialysis vs kidney transplant  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kidney Transplant: किडनी डायलिसिसनंतर रुग्णाला ट्रांसप्लांटची गरज का भासते? काय आहे कारण? जाणून घ्या

Why Kidney Transplant Is Needed: पहिली गोष्ट म्हणजे डायलिसिस हा किडनीच्या आजारावरचा इलाज नाही तर तात्पुरता उपाय आहे. याचा अर्थ असा की, डायलिसिस किडनीची कायमची जागा घेत नाही. रुग्णाला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलिसिस सेंटरमध्ये जावे लागते.

Manish Jadhav

जेव्हा एखाद्या व्यक्तीची किडनी नीट काम करणे थांबवते तेव्हा डॉक्टर डायलिसिसचा सल्ला देतात. डायलिसिस ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मशीनच्या मदतीने शरीरातील घाण आणि अतिरिक्त पाणी काढून टाकले जाते, जे सामान्यतः किडनीद्वारे केले जाते. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की, डायलिसिसद्वारे हे काम करता येत असेल तर किडनी ट्रांसप्लांटची का गरज भासते? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

डायलिसिस हा तात्पुरता उपाय

पहिली गोष्ट म्हणजे डायलिसिस हा किडनीच्या आजारावरचा इलाज नाही तर तात्पुरता उपाय आहे. याचा अर्थ असा की, डायलिसिस किडनीची कायमची जागा घेत नाही. रुग्णाला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलिसिस सेंटरमध्ये जावे लागते. रुग्णासाठी ही प्रक्रिया थकवणारी असते. हळूहळू त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो.

ट्रांसप्लांटमुळे जीवनात मोठा बदल होतो

जेव्हा एखाद्याची किडनी पूर्णपणे खराब होते आणि तो बराच काळ डायलिसिसवर असतो, तेव्हा डॉक्टर (Doctor) ट्रांसप्लांटचा सल्ला देतात. ट्रांसप्लांट म्हणजे दुसऱ्याची निरोगी किडनी रुग्णाच्या शरीरात बसवणे. जर शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली तर ही नवीन किडनी पुन्हा शरीरातील सर्व विषारी घटक आणि अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास सुरुवात करते. यामुळे व्यक्ती दैनंदिन दिनचर्या सामान्यपणे जगू शकतो. दररोज रुग्णालयात जाण्याची गरज भासत नाही. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारतात आणि शरीरात शक्ती परत येते. ट्रांसप्लांटनंतर बरेच लोक पुन्हा काम करण्यास किंवा अभ्यास करण्यास सुरुवात करतात.

प्रत्येक रुग्णासाठी ट्रांसप्लांट सोपे नसते

तथापि, ट्रांसप्लांट करणे प्रत्येकासाठी सोपे नाही. सर्वप्रथम, जुळणारा दाता शोधणे हे एक मोठे आव्हान आहे. ट्रांसप्लांटनंतर, शरीर नवीन किडनी स्वीकारेल आणि ते नाकारु नये म्हणून काही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. परंतु यादरम्यान काही रुग्णांची प्रकृती खूप खलावते होते. म्हणूनच, डायलिसिस सुरु झाल्यापासून डॉक्टर रुग्ण ट्रांसप्लांटसाठी तयार आहे की नाही याचे मूल्यांकन करतात. जर हो, असेल तर ट्रांसप्लांटची प्रक्रिया सुरु करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT