Body Wash VS Soap Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Body Wash VS Soap : बॉडीवॉश की साबण? त्वचेसाठी काय आहे जास्त फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

अनेक लोकांना साबणाने आंघोळ करणे आवडते, तर अनेकांना बॉडी वॉशने आंघोळ करायला आवडते.

दैनिक गोमन्तक

बॉडी वॉश आणि साबण यात काय फरक आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेक लोकांना साबणाने आंघोळ करणे आवडते, तर अनेकांना बॉडी वॉशने आंघोळ करायला आवडते. आपले शरीर स्वच्छ व्हावे आणि आपल्याला दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी आपण या गोष्टींचा वापर करतो. साबण आणि बॉडी वॉश वापरण्याचे कोणते फायदे आहेत जाणून घेऊया. (Body Wash VS Soap)

अनेक लोकांना जास्त फोम असलेल्या पाण्यात अंघोळ करायला आवडते. जर फोम नसेल तर अंघोळ केल्यासारखे वाटत नाही. अशा लोकांनी बॉडी वॉशचा वापर करावा. यात अनेक प्रकार आहेत जे बाजारात सहज मिळतील. लुफाचा वापर केल्याने बॉडी वॉश संपूर्ण शरीरावर पसरते. यामुळे दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते.

साबण वापरल्याने अनेक लोकांची त्वचा कोरडी पडते. पण बॉडी वॉशचा वापर केल्याने त्वचा नाजुक आणि मऊ होते. अनेक बॉडी वॉशमध्ये हायड्रेटिंग आणि मॉइस्चरायझिंग गुणधर्म असतात. ज्या लोकांची त्वचा साबण वापरल्याने कोरडी पडते त्या लोकांनी बॉडी वॉशचा वापर करावा. तसेच अनेक शॉवर जेल तुम्ही चेहऱ्यावर देखील वापरू शकता.

अंघोळ करतांना लुफाचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत मिळते. तसेच त्वचेमधील घाण साफ होऊन त्वचा निरोगी आणि स्वच्छ होते.

प्रवासात साबणापेक्षा बॉडी वॉश नेण्यास सोईस्कर असते. कारण साबण वापरल्यानंतर प्रत्येकवेळी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवावा लागतो. परंतु बॉडी वॉशबद्दल असे होत नाही. यामुळेच प्रवासात बॉडी वॉश नेणे सोपे जाते. बॉडी वॉशला कमी जागा लागत असल्याने तुम्ही आपल्या पर्समध्येही ठेवू शकता.

अंघोळ करतांना बॉडी वॉश कमी प्रमाणात वापरला जातो. यामुळे बॉडी वॉश अधिक काळ टिकू शकते. बॉडी वॉश आणि साबण हे दोन्हीं प्रकार आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. पण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार बॉडी वॉश किंवा साबणची निवड करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT