WhatsApp Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कसे कराल फोटोंचे स्टिकर्स, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

या फीचरमुळे आता तुम्हाला तुमचे स्वतःचे कस्टम स्टिकर्स तयार करता येईल.

Puja Bonkile

मेटा-मालकीच्या WhatsApp चे आज जगभरात लाखो यूजर्स आहेत. यूजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी कंपनी नवीन आणि रोमांचक फिचर्स लाँच करत असते. अलीकडेच कंपनीने iOS यूजर्ससाठी एक फिचर्स लाँच केले आहे. ज्याद्वारे तुम्ही फोटोंना स्टिकर्समध्ये रूपांतरित करू शकता. जरी आत्तापर्यंत तुम्ही प्लॅटफॉर्मवर स्टिकर्स फक्त कंपनीच्या माध्यमातून किंवा थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून वापरू शकत होते, परंतु या फीचरमुळे आता तुम्हाला तुमचे स्वतःचे कस्टम स्टिकर्स तयार करता येईल.

फोटोंचे स्टिकर्स कसे बनवायचे

  • फोटोंमधून स्टिकर्स बनवण्यासाठी सर्वात पहिले WhatsApp ओपन करावे.

  • यानंतर तुम्हाला एखाद्याचे चॅट ओपन करावे लागेल आणि स्टिकर्सवर जावे लागेल.

  • येथे तुम्हाला प्लस आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • यानंतर तुमची गॅलरी ओपन होणार.

  • येथून तुम्हाला जो फोटो स्टिकरमध्ये बदलायचा आहे तो सिलेक्ट करा.

  • असे केल्याने तुम्हाला एका क्लिकवर फोटोचे स्टिकर मिळेल.

स्टिकर ट्रेमध्ये सेव्ह होणार

प्लॅटफॉर्मच्या ऑटो-क्रॉप फंक्शनसह स्टिकर्स तयार केले जाऊ शकतात. तसेच मजकूर आणि फोटो कस्टमाइज करण्यात मदत करू शकतील. याव्यतिरिक्त एकदा स्टिकर पाठवल्यानंतर, ते युजर्स पाहिजे तेव्हा शेअर करण्यासाठी स्टिकर ट्रेमध्ये देखील सेव्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT