WHO Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WHO च्या 'या' मार्गदर्शक तत्वांची काळजी घेतल्यास होणार नाही मधुमेह अन् उच्च रक्तदाबाचा त्रास

दैनंदिन जीवनात फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

WHO on Diabetes and High Blood Pressure: तरुणांना झपाट्याने घेरणाऱ्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी काही आरोग्यविषयक सूचना जारी केल्या जात आहेत. 

यासोबतच अनेक वैद्यकीय संशोधनेही प्रसिद्ध होत आहेत. कोविड नंतर ज्या आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह टाइप -2 ची देखील बरीच प्रकरणे आहेत. 

जास्त साखर आणि जास्त मीठ खाल्ल्याने हाय बीपी आणि डायबिटीज टाईप-2 हा प्रामुख्याने होतो. यासोबतच तेल किंवा चरबीचे प्रमाणही जास्त असेल तर हे पदार्थ आपल्याला लवकर आजारी आणि अशक्त बनवतात. 

हे लक्षात घेऊन, जीवनशैलीमुळे लोकांना या आजारांना बळी पडणे टाळता यावे यासाठी डब्ल्यूएचओने निरोगी आहाराबाबत काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना याबाबत सतर्क केले होते, त्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या बाजारात मिळणाऱ्या जंक फूडवर बंदी घातली होती.

  • एका दिवसात किती मीठ खावे? 

डब्ल्यूएचओच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी व्यक्तीने एका दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हाडे (Bones) कमकुवत होण्याची समस्या वाढू शकते.

  • एका दिवसात किती साखर खावी?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी व्यक्तीने दिवसातून 6 ते 8 चमचे साखरेचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला साखरेची समस्या किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही शुद्ध साखर (Sugar) वापरणे पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी फळे आणि सुका मेवा खा. जेणेकरून तुमची गोड लालसा शांत होईल आणि तुम्हाला नैसर्गिक साखरेची ऊर्जा मिळेल.

एका दिवसात किती तेल खावे?

  • ज्या व्यक्तीला कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब किंवा साखरेची समस्या किंवा कोणताही दीर्घ, गंभीर आणि जुनाट आजार नाही, त्या व्यक्तीने दिवसातून जास्तीत जास्त 4 चमचे तेल वापरावे. 

    हेच प्रमाण वितळलेल्या देशी तुपासाठी देखील लागू आहे. मात्र, देशी तूप गायीचे असेल तर त्याचे प्रमाण एक-दोन चमच्याने वाढवता येते. दैनंदिन जीवनात या निश्चित प्रमाणापेक्षा जास्त चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हृदयविकाराचा (Heart Attack) झटका किंवा पक्षाघाताचा धोकाही वाढतो. 

  • त्यामुळे डायबिटीज टाईप-2, हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीची समस्या टाळायची असेल तर रोजच्या आहारात तेल, साखर आणि मीठ यांचा योग्य प्रमाणात वापर करा.

     त्यांचे अतिसेवन तुम्हाला आजारी बनवू शकते आणि त्यांचे कमी सेवन केल्याने तुमचे शरीर कमजोर होऊ शकते. कारण शरीरात साखरेची किंवा मीठाची कमतरता असेल तर बीपी कमी होतो, हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT