Urinary Tract Infection Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Urinary Tract Infection: वारंवार होणाऱ्या युरिन इन्फेक्शनपासून बचाव करतात 'हे' पदार्थ

नियमितपणे हे पदार्थ खाल्ल्यास युरिन इन्फेक्शनचे प्रमाण होणार नाही.

दैनिक गोमन्तक

युरिन इन्फेक्शनची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळते. पण ही समस्या महिलांमध्ये अधिक सामान्य असून वारंवार उद्भवते. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की पुरुषांपेक्षा महिलांना युरिन इन्फेक्शन का होते. असे काही पदार्थं आहेत जे खाल्ल्याने महिलांना युरिन इन्फेक्शन लवकर बरा होऊ शकतो.

  • युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी काय खावे?

  1. दही

    दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आतडे निरोगी ठेवण्यास आणि मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

  2. लसूण

    यामध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात, जे शरीरात कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात. हे खाल्ल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय हे बॅक्टेरियाही लवकर वाढत नाहीत.

curd
  1. यीस्ट फूड्स

    प्रोबायोटिक्स म्हणजेच यीस्ट वाढवून तयार केलेले पदार्थ, त्यांच्या सेवनाने आतडे आणि मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

  2. पाणी भरपुर पिणे

    ऋतूनुसार आणि तुमच्या कामानुसार दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यावे. कारण जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात युरिन करता तेव्हा मूत्रमार्ग साफ होतो. जिवाणूंच्या वाढीसाठी हे अतिशय नाजूक क्षेत्र आहे. यामुळे त्याची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

  3. बेरी खा

    क्रॅनबेरी, ब्लूबेरी, द्राक्षे यासारखी फळांचे (Fruits) सेवन करावे. याच्या सेवनाने शरीराला बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ मिळतो आणि यूटीमध्ये बॅक्टेरियाची वाढ होत नाही.

  4. व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ

    अशा पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. जेव्हा एखादा जीवाणू शरीरावर बाहेरून हल्ला करतो तेव्हा रोगप्रतिकारकशक्ती नष्ट करतात आणि संसर्ग टाळतात.

काय काळजी घ्यावी

  • जास्त वेळ युरिन रेखु नये.

  • अंतरंग स्वच्छतेची काळजी घ्या आणि दिवसातून दोनदा पाण्याने स्वच्छ करावे.

  • खूप घट्ट कपडे घालून जास्त वेळ राहू नका.

  • लैंगिक संबंधानंतर खाजगी जागा स्वच्छ करावी.

  • टॉयलेट सीटच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT