Viral Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video: अरे देवा! चक्क कोब्रा सापाला घातली शॅम्पूने आंघोळ...

सापाला शॅम्पूने आंघोळ घालताना पाहिलं आहे का....? तेही माणसाच्या हातातून?

दैनिक गोमन्तक

सापाला शॅम्पूने आंघोळ घालताना पाहिलं आहे का....? तेही माणसाच्या हातातून? सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला या व्हिडीओमध्ये एक माणूस सापाला आंघोळ घालतांना दिसत आहे. विश्वास बसत नाही ना! या व्हिडीओमध्ये तो प्रथम सापाला शॅम्पू लावतो, नंतर त्याला घासतो आणि त्याला आंघोळ घालतो.

जसे एक आइ आपल्या मुलाला आंघोळ घालते. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साप त्यांची त्वचा खराब झाल्यावर कात सोडतात. हे काम ते वर्षातून तीन ते चार वेळा करतात. असे केल्याने सापाच्या अंगावर काही संसर्ग झाला तर तो जातो आणि त्वचाही स्वच्छ होते.

हा व्हिडिओ (Video) 44 सेकंदा असून यामध्ये सापाला आंघोळ घालतांना दिसत आहे. शॅम्पूच्या बाटलीतून अनेक वेळा शॅम्पू (Shampoo) घेऊन तो सापाच्या शरीराला चांगले घासतो. जसं आई आपल्या बाळाला चोळून आंघोळ घालते, यानंतर, मोठ्या काळजीने, तो सापावर पाणी ओतून शॅम्पू साफ करतो. आंघोळीच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सापाचा स्वभाव अतिशय शांत राहतो आणि स्वतःला पूर्णपणे त्या व्यक्तीसाठी समर्पित करतो. त्यामुळेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण लिहित आहेत की, दोघांची मैत्री घट्ट आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर एका व्यक्तिने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - पहा साप आणि मानव यांच्यातील प्रेम. पार्श्वभूमीत एक मल्याळम चित्रपटाचे गाणे वाजत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या मुलाप्रमाणे एक माणूस सापाला अंघोळ घालत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत आठ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे 100 लाईक्स मिळाले आहेत. युजर्सनी कमेंटही केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'मसाज पार्लर, स्पाचे परवाने रद्द करा'! हरमलवासीयांची पंचायतीवर धडक; पर्यटनस्थळ बदनाम होत असल्याचा दावा

पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या 'विकल्या' तर नोकरशाही जनतेची सेवा करणार की भ्रष्टाचार? पोसलेले अराजक नष्ट करण्यासाठी सुसंस्कार हवेत..

Bangladesh Violence: बांगलादेशात 'हिंदू' निशाण्यावर! डिसेंबर महिन्यात 12 जणांचा बळी; हत्यांमागे नियोजित कट?

अग्रलेख: 25 बळी गेल्यानंतर पंचायत बरोबर होती, असा निवाडा काय कामाचा? पंचायती पारदर्शकता बाळगतील का?

Holi Special Train: होळीच्या पार्श्वभूमीवर खुशखबर! 34 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT