No Shave November Campaign Dainik Gomantak
लाइफस्टाइल

No Shave November Campaign : नेमकं काय आहे 'नो शेव्ह नोव्हेंबर'? जाणून घ्या पुरुष या महिन्यात दाढी का करत नाहीत

No Shave November Campaign : नोव्हेंबर सुरू होताच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'नो शेव्ह नोव्हेंबर' ट्रेंडिंग सुरू झाले आहे

दैनिक गोमन्तक

नोव्हेंबर सुरू होताच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'नो शेव्ह नोव्हेंबर' ट्रेंडिंग सुरू झाले आहे, याचा संबंध पुरुषांच्या दाढीशी आहे हे उघड आहे. याची एवढी चर्चा का? चला तर मग आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊया.

खरं तर, 'नो शेव्ह नोव्हेंबर'मध्ये पुरुषांना 30 दिवस केस वाढवायला सांगण्यात येते. यामध्ये पुरुषांना त्यांची दाढी वाढवण्याचे आणि केस न कापण्याचे आव्हान देण्यात आले आहे. ही मोहीम अनेक रोग आणि आजारांबद्दल तसेच पुरुषांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी चालवली गेली. (No Shave November Campaign)

या आजारांबद्दल जागरूकता

'नो शेव्ह नोव्हेंबर' ही एक जनजागृती करणारी मोहीम आहे जी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पुरुषांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आजारांविरुद्ध केली जाते, जसे की-

  • प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer)

  • टेस्टिक्युलर कॅन्सर (Testicular Cancer)

  • खराब मानसिक आरोग्य - नैराश्य (Poor Mental Health-Depression)

  • शारीरिक निष्क्रियता (Physical Inactivity)

याचे उद्दिष्ट काय आहे?

ही मोहीम पुरुषांना त्यांचे केस वाढवण्यास प्रोत्साहित करते, त्यांना नोव्हेंबर महिन्यात अजिबात दाढी न करण्यास सांगण्यात येते. यामुळे कर्करोगाविषयी विशेषत: पुरुषांमध्ये जागरूकता वाढते.

पुरुषांमध्ये कर्करोग

टेस्टिक्युलर कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर हे पुरुषांमधील दोन सर्वात सामान्य कर्करोग मानले जातात, नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेने पुरुषांना प्रभावित करणाऱ्या या समस्यांवर 1,000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये लाखो लोकांचा समावेश केला आहे. याची खूप मदत झाली आहे. या मोहिमेचा सर्व कर्करोग संशोधनाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT