Daily योग सेतुबंधासन Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily योग: सेतुबंधासनात शरीराची स्थिती पूलाप्रमाणे होते

सेतुबंधासन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो.

दैनिक गोमन्तक

सेतुबंधासन या आसनाचं नाव सेतू आणि बंध या दोन शब्दांपासून बनला आहे. सेतू म्हणजे पूल आणि बंध म्हणजे बांधणे. हे आसन करताना शरीराची स्थिती ही एका पूलाप्रमाणे होते, म्हणून त्यास सेतुबंधासन असं म्हणतात. (What are the benefits of setubandhasana)

सेतुबंधासन कसे करावे?

सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत. कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा. सवयीनुसार आणि शरीराच्या लवचिकतेनुसार त्याची क्षमता वाढवता येईल. या स्थितीत काही सेकंदं थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत यावे. पाठिला दुखापत झाल्यास हे आसन करणं टाळावं.

सेतुबंधासन करण्याचे फायदे

- पाठिचा कणा बळकट होतो.

- शरीराची लवचिकता वाढते.

- पचनाची प्रक्रिया सुलभ होते.

- मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो.

- पाठदुखी, थकवा, अनिद्रा दूर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT