पादांगुष्ठासन हा शब्द पाद, अंगुष्ठ आणि आसन या तीन शब्दांपासून बनला आहे. यापैकी पाद म्हणजे पाय, अंगुष्ठ म्हणजे अंगठा. दररोज पादांगुष्ठासन केल्यास त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे आसन कसं करावं आणि त्याचे फायदे कोणते, ते जाणून घेऊयात..
पादांगुष्ठासन कसे करावे?
सर्वप्रथम योग मॅटवर सावधान अवस्थेत पाठीवर झोपा. त्यानंतर श्वास घेत हळूहळू डावा पाय वर उचला. हे करताना दोन्ही पाय ताठ असावेत, याची काळजी घ्या. यानंतर श्वास सोडत डाव्या हाताने उचललेल्या डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. अंगठा पकडल्यानंतर डावा पाय आणि उजवा पाय ताठ ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहिल्यानंतर पूर्व स्थितीत या. नंतर पुन्हा हीच क्रिया उजव्या पायाने करा.
हे आसन करताना सुरुवातीला लवचिकता नसल्याने पाय 90 अंशांनी वर ताठ उचलता येत नाही. अशा वेळी शक्य तितका वर उचलून बेल्ट किंवा दुपट्ट्याच्या सहाय्याने पाय स्वत:कडे ओढण्याचा हळूहळू प्रयत्न करावा.
पादांगुष्ठासनाचे फायदे कोणते?
- या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.
- पायांचे स्नायू मोकळे होतात.
- पायांमधील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
- शरीराच्या स्नायूंना बळकटी मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.