Benefits of Drinking Hot Milk: दुध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच आयुर्वेदातसुध्दा दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. शरीर फिट आणि निरोगी ठेवायचे असेल तर यासाठी तुम्हाला दररोज दुध पिण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्य तज्ञांच्या मते काही कारणास्तव तुम्हाला दिवसभरात कोणत्याही वेळेचे जेवण घेता येत नसेल तर, तुम्ही एक ग्लास दुधाचे सेवन करून त्याची भरपाई करू शकता.
दुधाद्वारे आपल्या शरीराला कॅल्शियम, प्रथिने, नैसर्गिक चरबी, कॅलरीज, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-2 आणि पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. दूध थंड करण्याऐवजी गरम प्यायल्यास त्याचे पौष्टिक मूल्य लक्षणीय वाढते.
एनर्जी बूस्टर
दुधात भरपूर प्रथिने असतात. म्हणूनच दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज रात्री एक ग्लास गरम दूध प्यायल्याने दुसऱ्या दिवशी एनर्जी राहते. त्याचबरोबर दूध प्यायल्याने स्नायूंचा विकास होण्यासही मदत होते.
हाडे मजबूत होतील
दुधामध्ये (Milk) कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जे हाडे (Bones) मजबूत करण्याचे काम करते. गरम दूध प्यायल्याने हाडांची घनता वाढते आणि तुमचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनते.
मधुमेहामध्ये फायदेशीर
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे असे करणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि त्यांचे आरोग्य (Health) चांगले राहते.
थकवा दूर करते
आजच्या काळात लोक कामात इतके व्यस्त झाले आहेत की ते स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. थकवा आणि चिडचिड होत असेल तर गरम दुधाचे सेवन करावे.
झोपेची कमतरता राहणार नाही
रात्री झोपतांना एक ग्लास कोमट दूध प्यावे, ते शरीर आणि मनाला प्रचंड आराम देते. असे केल्याने झोपेची गुणवत्ता चांगली राहते ज्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.