kothimbir vadi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weekend Recipe: वीकेंडला बनवा स्पेशल, नाश्त्यात घ्या खमंग, कुरकुरित कोथिंबीर वडीचा आस्वाद

Puja Bonkile

Weekend Recipe: वीकंड स्पेशल बनवण्यासाठी सकाळी नाश्त्यात काय बनवावे असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. कोथिंबीर आणि बेसणपासून बनवलेली कोथिंबीर वडी चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. खास म्हणजे ग्लूचेन फ्री असल्याने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ही वडी बनवायला सोपी आहे. कोथिंबीर वडी कशी बनवावी जाणून घेऊया.

  • कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 जोडी कोथिंबीर

आवश्यकतेनुसार बेसण

1 चमचा दही

1 चमचा लसूण पेस्ट

1 चमचा ओवा

1/2 चमचा पांढरे तीळ

1 चमचा मोहरी

1 चमचा लाल तिखट

4/5 हिरवी मिरची

1 हिंग

तेल आवश्यकतेनुसार

मीठ चवीनुसार

  • कृती

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सरवात पहिले कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवावी. नंतर एका भाड्यात बेसण घेऊन त्यात बारिक चिरलेली कोथिंबीर, दही, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण पेस्ट, चांगले मिक्स करावे. नंतर ओवा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. नंतर याचे लांब रोल करून घ्यावे. हे रोल वाफवूण घ्यावे. तुम्ही इडलीच्या भाड्यांचा वापर करू शकता. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि तीळ टाकावे. हा तडका वडीवर टाकावा. तुमचा चविष्ट आणि हेल्दी नाश्ता तयार आहे. तुम्ही संध्याकाळच्या नाश्तात देखील या वड्या खाऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT