जगभरात सध्या हेल्थकेअर क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हेल्थकेअर क्षेत्रात यायचंय? टेक महिंद्रा फाउंडेशनचा SMART पर्याय

सध्या SMART हेल्थकेअर अकॅडमीमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट, हॉस्पिटल हायजिन असिस्टंट, हॉस्पिटल फ्रंट ऑफिस अँड बिलिंग एक्झिक्युटीव्हच्या कोर्ससाठी प्रवेश सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात सध्या हेल्थकेअर (Healthcare) क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने (Mahindra Foundation) पुढाकार घेतला आहे. हेल्थकेअरसाठी SMART अकॅडमी, (SMART Academy) पुणे सुरु केले आहे. या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील ही आठवी SMART अकॅडमी आहे. तसंच हेल्थकेअर आणि पॅरामेडिक्स क्षेत्रातील चौथी असल्याची माहिती टेक महिंद्रा फाउंडेशनने दिली आहे. Salesian Sisters च्या सहयोगाने हे काम सुरु आहे. पुण्यातील मुंढवा इथं 7 हजार 516 चौरस वर्ग फूट इतक्या परिसरात ही संस्था आहे. यामध्ये 7 क्लासरूम आणि सर्व सुविधांसह अद्ययावत अशा 7 लॅब आहेत.

सध्या SMART हेल्थकेअर अकॅडमीमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट, हॉस्पिटल हायजिन असिस्टंट, हॉस्पिटल फ्रंट ऑफिस अँड बिलिंग एक्झिक्युटीव्हच्या कोर्ससाठी प्रवेश सुरु आहे. हेल्थकेअर सेक्टर स्किल काउन्सिलचे सर्टिफाइड असे हे कोर्स आहेत. यासोबत संस्था मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, व्हिजन अँड ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी आणि एक्सरे अँड इमेजिंग टेक्नॉलॉजीचेसुद्धा प्रशिक्षण देते.

हेल्थकेअर ट्रेनिंगशिवाय विद्यार्थ्यांना फाउंडेशन स्किल कोर्सचे प्रशिक्षणही दिले जाते. यामध्ये इंग्लिश, बेसिक आयटी आणि सॉफ्ट स्किल्स शिकवली जातात. तसंच कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना एक सहाय्यक मदत करतो. करिअऱच्या दृष्टीकोनातून हे सर्व कोर्स तयार करण्यात आले आहेत.

संस्थेची वैशिष्ठ्ये

1. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा

2. मोठ्या आणि नामांकित रुग्णालयामध्ये प्रशिक्षण

3. प्लेसमेंट असिस्टन्स

4. तज्ज्ञ मार्गदर्शक आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 च्या माध्यमातून असंख्य असे करिअर ओरिएंटेड कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील. रजिस्ट्रेशन करण्यासाठी www.sakalexpo.com वर क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT