Walnut Barfi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Fruits Barfi Recipe: मुलांसाठी बनवा चविष्ट अक्रोड बर्फी

Walnut Barfi Making Tips: अक्रोड बर्फी बनवायला अगदी सोपी आहे.

दैनिक गोमन्तक

शरीर निरोगी ठेवण्यासाठी ड्राय फ्रूट्स (Dry Fruits) खाणे खूप गरजेचे आहे. मेंदू आणि मुलांच्या योग्य विकासासाठी सुकामेवा खाणे देखील आवश्यक आहे. अनेक वेळा मुलांना सुका मेवा खायला आवडत नाही. विशेषत: अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने लहान मुलांना त्रास होतो. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अक्रोड आरोग्यदायी मानले जाते. जर मुल अक्रोड (Walnut) खात नसेल तर तुम्ही त्यांना विविध डिश म्हणून अक्रोड खाऊ घालू शकता. तुम्ही अक्रोड बर्फी बनवून मुलाला देऊ शकता. मुलाला चवदार अक्रोड बर्फी खायला नक्की आवडेल. अक्रोडापासून बर्फी (Walnut barfi) झटपट कशी बनवायची हे जाणून घेऊया. (Walnut Barfi Making Tips News)

* अक्रोड बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • अक्रोड - 1/2 कप

  • साखर - 2 टेबलस्पून

  • दूध पावडर - 2 चमचे

  • दूध- 2 टेबलस्पून

  • जायफळ पावडर - एक चिमूटभर

  • तूप - 1 टीस्पून

* अक्रोड बर्फी तयार करण्याची रेसिपी

  • अक्रोड बर्फी तयार करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अक्रोड बारीक करावे लागतील.

  • आता एका भांड्यात दूध, मिल्क पावडर, जायफळ पावडर आणि साखर याचे मिश्रण तयार करावे.

  • दुसऱ्या भांड्यात अक्रोड आणि तूप एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे भाजून घ्या.

  • नंतर वरील तयार मिश्रणमध्ये यामध्ये मिक्स करावे. बर्फी तयार करून घ्यावी.

  • आता ज्या भांड्यात बर्फी बनवायची आहे त्याला तूप लावून ग्रीस करा.

  • बर्फीचे मिश्रण मायक्रोवेव्हमधून काढून ट्रेमध्ये ठेवा आणि सेट करून ठेवा.

  • तुम्हाला साधारण 1 तास असेच ठेवावे लागेल. यानंतर बर्फीला हव्या त्या आकारात कापून घ्या.

  • स्वादिष्ट अक्रोड बर्फी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आमका नाका मोबईल टॉवर! सरकारी प्राथमिक शाळेजवळ टॉवर नकोच

Balli Sarpanch: पारोडानंतर बाळ्ळी पंचायतीवरही भाजपचे वर्चस्व, हर्षद परीट झाले सरपंच

राजस्थानी तरुणाला हडफडे येथे अज्ञाताकडून जबर मारहाण; गॅस सिलिंडर अफरातफरीचा केला होता आरोप

Dussehra 2025 Wishes In Marathi: आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेऊनी आली विजयादशमी...प्रियजनांना पाठवा दसऱ्याच्या मराठीतून शुभेच्छा

Viral Video: महिलेची हातचलाखी, ज्वेलरी शॉपमधून चोरी केला सोन्याचा महागडा नेकलेस, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT