Viral Video: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video: काहीतरी अजबच! विना हेल्मेट पकडल्यामुळे तरूणाने पोलिसाचे बोटच चावले; पाहा व्हिडिओ!

Puja Bonkile

viral video man bites finger traffic police while riding without helmet

सोशल मिडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एका दुचाकीस्वाराला हेल्मेट घातल्याने पोलिसांनी पकडल्यावर वैतागला आणि त्याच्या बोटालाच चावला.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ बेंगळुरूचा आहे. या व्हिडिओमध्ये एका दुचाकीस्वाराने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला विल्सन गार्डन 10 व्या क्रॉसजवळ हेल्मेट न घातल्यामुळे थांबवले होते. तेव्हा वाहतूक पोलिसांशी हाणामारी केली. एवढेच नाही तर तो इतका संतापला की त्याने पोलिसाचे बोट दाताने चावले.

12 फेब्रुवारीला विल्सन गार्डन परिसरात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला आहे. इंडिया टुडेशी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबद्दल अधिक माहिती देत सांगितले की, एफटीव्हीआर वापरून 'नो हेल्मेट' उल्लंघन केल्याबद्दल त्या व्यक्तीविरुद्ध संपर्क नोंदवण्यात आला आहे.

कारण त्यांनी सांगितले की, 'त्या व्यक्तीने कॉन्स्टेबलवर हल्ला केला आणि त्याचा मोबाइल फोन हिसकावला.

त्याला थांबवल्यानंतर त्याने पोलिसांना मारहाण करून त्याचे बोट चावले. या व्यक्तीला तत्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यावर अनेक कमेंट देखील येत आहेत. अनेक युजर्स त्या तरुणाला कठोर शिक्षा व्हायला हवी अशी कमेंट करत आहेत तर काही तरुणाने घाबरून असे केले असेल असे बोलत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT