सोशल मिडियावर कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. पण अलिकडेच एक सुपर क्युट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या गर्भवती शिक्षिकेसाठी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते, ज्याचा व्हिडिओ व्हायरल सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तसेचर अनेक लोक बेबी शॉवर पार्टी घरी साजरी करतात. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांनी वर्गात बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले तेव्हा शिक्षिकेला खुप आश्चर्य वाटले. आश्चर्यकारक बाब म्हणजे गर्भवती शिक्षिकेला याबाबत काहीच माहिती नव्हती. त्याच्यासाठी हे एक सुंदर सरप्राईज होते.
लोकांना शिक्षिकेची प्रतिक्रिया खूप आवडली
या व्हिडिओमध्ये शिक्षिका आपल्या सहकाऱ्यांसह वर्गात दाखल होताच तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वर्गात प्रवेश करताच तिने जे पाहिले ते पाहून तिला आश्चर्य वाटले. ती तिथून हसत आणि लाजत बाहर जाते, पण इतर महिला शिक्षिकेला वर्गात आणून केक कापायला लावतात.
गर्भवती शिक्षिकेची प्रतिक्रिया अप्रतिम होती, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून लोक याला 'सुपर क्यूट' व्हिडिओ म्हणत आहेत. या सरप्राईजने शिक्षिका किती खूश आहेत हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ केरळमधील थलासेरी येथील कॉलेज ऑफ नर्सिंग थलासरी अँड को-ऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्समधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'perfect__okay' या हँडलने शेअर केला आहे. जो मोठ्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहे. या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक मिळाले असून व्हिडिओ 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एकाने लिहिले की, हे शिक्षिका या बॅचच्या मुलांना कधीच विसरणार नाहीत. आणखी एकाने लिहिले की, या व्हिडिओमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात कशा प्रकारचे नाते असावे हे पाहिले जाऊ शकते.
एकाने लिहिले की व्हिडिओ पाहिल्यानंतर माझे डोळे भरून आले, त्यामुळे त्या शिक्षकाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. एक वेगळीच अनुभूती आहे. एकाने लिहिले की मी पहिल्यांदाच वर्गात बेबी शॉवर पार्टी पाहिली आहे. एकाने लिहिले की, प्राध्यापकांची प्रतिक्रिया खरोखरच पाहण्यासारखी आहे. एकाने लिहिले की त्याची पहिली प्रतिक्रिया पाहून मला खूप आनंद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.