Home Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies for Viral Fever: ऋतू बदलताच तुम्हालाही येतो का ताप ? 'हे' करा घरगुती उपाय

बदलत्या ऋतूमानानुसार अनेक लोकांना व्हायरल फिव्हरचा त्रास सुरू होतो. या घरगुती उपायांनी तुम्ही त्यापासून मुक्ती मिळवता येऊ शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

हिवाळ्याचा ऋतू (winter season) येताच आपल्या आजूबाजूला अनेक बदल घडू लागतात. थंडीमुळे आपल्या खाण्यापासून ते राहणीमानापर्यंत जीवनशैलीत अनेक बदल होतात. तसेच सध्या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे वातावरणात बराच बदल झालेला आहे. पण याच बदलत्या ऋतूचा (change in climate) आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे आपण बऱ्याच वेळेस अनेक आजारांना बळी पडतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, संसर्गजन्य ताप येण्याचे प्रमाण वाढू लागते. अशा परिस्थितीत, काही घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

  • आलं

आल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हिवाळ्यात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सर्दी-खोकला किंवा तापाच्या समस्येने हैराण असाल तर त्यापासून आराम मिळण्यासाठी आलं उपयुक्त ठरतं. यासाठी आल्याची पेस्ट तयार करून त्यात मध मिसळून त्याचे सेवन करा. तुम्ही आलं शिजवूनही खाऊ शकता.

  • दालचिनी

संसर्गामुळे अनेकदा घसा खवखवणे, खोकला, सर्दी अशा समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत दालचिनी खूप उपयुक्त ठरते. यासाठी एक कप पाण्यात एक छोटा चमचा दालचिनी पावडर मिसळा आणि नंतर हे पाणी उकळून गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर हे पाणी प्यावे, त्याने आराम मिळेल.

  • तुळस

तुळस ही खूप औषधी असते हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्याचे अनेक गुणधर्म असून ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. तुळशीची पाने, अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध असतात. तुळशीच्या पानांमुळे विषाणूजन्य संसर्ग रोखण्यास मदत होते. सर्दी , खोकला किंवा ताप असेल तर तुळशीची पाने पाण्यात उकळवून ते पाणी कोमट करून प्यायल्यास आराम मिळतो.

  • काळी मिरी

गरम मसाला म्हणून वापरण्यात येणारी काळी मिरी ही तापामध्येही गुणकारी ठरते. एक चमचा हळद, एक चमचा काळी मिरी, एक चमचा सुंठ पावडर, थोडा गूळ एक कप हे सर्व पाण्यात उकळून घ्यावे. पाणी निम्मे झाल्यावर गॅस बंद करावा व गार करून ते पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT