Vastu Tips: Use alum to get positive energy in your home on Diwali dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: दिवाळीत घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी तुरटीचा करा असा वापर

तुरटीचा वापर घरात सुख-शांती टिकून राहण्यासाठी मदत करते.

दैनिक गोमन्तक

'दिव्यांचा उत्सव' म्हणून दिवाळी सण ओळखला जातो. दिवाळीचा सण मंगलमय व्हावा आणि अनेक आनंद घेवून येवो अशी प्रत्येकांची इच्छा असते. वास्तुशास्त्रात यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. तुरटीला वास्तुशास्त्रात शुभ मानले जाते. दिवाळीनिमित्त वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत ते जाणून घेऊया.

* वास्तुदोष दूर करण्याचे उपाय

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यात लोखंडी भांड्यात तुरटीचा तुकडा ठेवावा. दिवाळीच्या दिवशी हे अवश्य करून पहा आणि नंतर दर महिन्याला तुरटीचे तुकडे बदला.

* वाईट नजरेपासून बचाव

दिवाळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावी. तुम्हाला हवे असल्यास घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून ठेवू शकता. असे केल्यानेघरात सुख-समृद्धी टिकून राहते.

* नजर उतरवण्यासाठी फायदेशीर

दिवाळीच्या दिवशी घरातील एखाद्या व्यक्तीची नजर काढायची असेल तर तुरटीचा छोटा तुकडा घेवून डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा फिरवा. नंतर तुरटी जाळाऊन टाका. असे केल्याने लागलेली वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो.

* पती-पत्नीमधील संबंध सुधारण्यासाठी फायदेशीर

पती-पत्नीमध्ये जर जास्त भांडणे होत असतील अत्र तुरटी एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवा. सकाळी तुरटीचे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. यामुळे परस्पर संबंध सुधारण्यास मदत मिळते.

* नकारात्मक ऊर्जा दूर होते

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी घराच्या दारावर तुरटी ठेवावी. दुसऱ्या दिवशी तुरटी पाण्यात वीतळवून ते पाणी झाडांना टाकून द्यावे.

* कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी

जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्या येत असेल तुम्ही दिवाळीच्या दिवशी पूजा केल्यानंतर लाल कपड्यात तुरटी बांधून डाव्या हाताला बांधावी. असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायात येणाऱ्या समस्या कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT