Money Plant  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Money Plant Vastu Tips: मनी प्लांट लावण्यापुर्वी या गोष्टी मातीत करा मिक्स, दूर होतील आर्थिक समस्या

Vastu Tips For Money Plant: वास्तुनुसार घरात मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात.

Puja Bonkile

Vastu Tips For Money Plant: हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. घर सजवणे आणि ते व्यवस्थित ठेवणे खूप महत्वाचे आहे. किचनमध्ये रोपं ठेवण्याचे नियमही सांगितले आहेत. 

वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्यास आर्थिक समस्या दूर होतात. मनी प्लांट देखील यापैकी एक वनस्पती आहे. मनी प्लांट जितक्या लवकर वाढतो तितकाच शुभ मानला जातो असे म्हणतात.

मनी प्लांट लावण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने माणसाला कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि शुभ परिणामही मिळू शकतात.

असा लावा मनी प्लांट

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा लोखंडी कुंडीमध्ये लावू नका. मातीच्या भांड्यात आणि काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात माता लक्ष्मी निवास करते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात.

नाणी

मनी प्लांट लावण्यापूर्वी मातीत नाणी टाकली पाहिजेत, असा समज आहे. हे पैसे आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. एवढेच नाही तर मनी प्लांटमुळे घरात सुख-शांती येते. 

साखर

जर तुम्ही मनी प्लांट लावत असाल तर त्याच्या मातीत साखर जरूर घालावी. यामुळे माता लक्ष्मीची कृपा अबाधित राहते आणि व्यक्तीला कधीही आर्थिक नुकसान सहन करावे लागत नाही. मातीत साखर मिक्स केल्याने राहू दोष दूर होतो आणि व्यक्तीला शुभ परिणाम मिळू लागतात.

दूध

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्यापूर्वी मातीत थोडं दूध मिक्स करावे. यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो आणि व्यक्तीला शुभ परिणाम मिळू लागतात. कर्जातूनही सुटका मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT