Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: नवरात्रीत वास्तुनुसार 'या' दिशेला ठेवावा अखंड दिवा

वास्तुनुसार नवरात्रीत कोणत्या दिशेला घटस्थापना करावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

देशभरात नवरात्री हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे प्रत्येक घरात स्वच्छता करून सजावट सुरू झाली आहे. घटस्थापनेसाठी वास्तुशास्त्रात योग्य दिशा कोणती आणि त्याचे महत्व काय आहे सांगितलेले आहे.

कोणत्या दिशेला करायची स्थापना

नवरात्रीमध्ये 9 दिवस घरोघरी अखंड दिवा आणि घटस्थापना केली जाते. या अखंड दिव्यासाठी घरातील कोणती दिशा उत्तम आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. माता दुर्गेची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला ठेवावी. ईशान्य दिशा ही सर्वोत्तम आहे असे मानले जाते. ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते. ईशान्य दिशेला देवाचा वास असतो. त्यामुळे वास्तुनुसार नवरात्रीमध्ये या दिशेला माता दुर्गेची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.

घरामध्ये इशान्य कोन कसे ओळखावे?

उत्तर-पूर्व दिशा ही आपल्या घराची सर्वात पवित्र दिशा मानली जाते. उत्तर आणि पूर्वेतील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात. या दिशेला घरात मंदिर बांधणे वास्तुनुसार शुभ मानले जाते. कारण या दिशेला देवांचा वास असतो. ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. जेणेकरून घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास राहतो. ईशान्य दिशेला देवतांचे निवासस्थान म्हटले जाते. जर तुम्ही तुमच्या घरात कलश आणि फोटो या दिशेला लावले तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात राहत नाही आणि या दिशेची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. वास्तूनुसार माता दुर्गेची मूर्ती लाकडी पाटावर ठेवावी. जर तुमच्याकडे चंदनाचा स्टँड असेल तर तुम्ही त्यावरही ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: साडेचार हजार मतांचा फायदा कोणाला?

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SCROLL FOR NEXT