Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Main Door: घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा?

घराचा मुख्य दरवाजा हे त्या कुटुंबाच्या यशा अपयशाचे कारण ठरू शकते असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

घराचा मुख्य दरवाजा हे त्या कुटुंबाच्या यशा अपयशाचे कारण ठरू शकते असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे. पण हा दरवाजा केवळ शुभ दिशेला असून चालत नाही. शुभ दिशेला असला तरी देखील ते कुटुंब तुटू शकते.

दरवाजा नेहमी दक्षिण दिशा सोडून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि इतर उपदिशांकडे असावा असे सांगितले जाते. परंतू ते अर्धसत्य आहे. तुम्ही घरात येता ती दरवाजाची दिशा नसून तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुमचा चेहरा ज्या दिशेला असतो ती तुमच्या दाराची दिशा असते. सर्वात चांगली दिशा म्हणजे पूर्व असते.

पूर्व ही जरी शुभ दिशा असली तरी तुमच्या घराचा दरवाजा त्या दिशेला असेल तर ती फायद्याची ठरेल असे नाही. तुमच्या ग्रहांवर ती दिशा शुभ की अशुभ ते ठरते. जर तो ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असेल तर घराचा मुख्य दरवाजा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. पण जीवनात अनावश्यक समस्या सुरू होतात.

घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते. पण जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर या दरवाजामुळे घरावर कर्जाचा बोजा वाढू लागतो. यामुळे आर्थिक समस्या वाढु शकते. म्हणून घर खरेदी करताना किंवा बांधताना आधी आपल्या कुंडल्यांचा अभ्यास करून घ्यावा. त्यानंतर तुमच्यासाठी योग्य दिशा कोणती हे ठरवावे.

घराचा मुख्य दरवाजा जर पश्चिम दिशेला असेल तर ते धन आणि संपत्तीच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जाते. पण जर कुंडलीत बुध ठीक नसेल तर यामुळे घरात पैसा राहत नाही. परंतू तुम्हाला दक्षिण दिशा देखील भरभराट देऊ शकते. दक्षिण दिशेला दरवाजा असू नये, ती यमाची दिशा असे सांगितले जाते.

घराचा मुख्य दरवाजा जर पश्चिम दिशेला असेल तर ते धन आणि संपत्तीच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जाते. पण जर कुंडलीत बुध ठीक नसेल तर यामुळे घरात पैसा राहत नाही. परंतू तुम्हाला दक्षिण दिशा देखील भरभराट देऊ शकते. दक्षिण दिशेला दरवाजा असू नये, ती यमाची दिशा असे सांगितले जाते. पण तुमची कुंडली पाहिली का?

घरातील सर्व समृद्धी संपते. घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर साधारणपणे हा दरवाजा जीवनात संघर्ष वाढवतो. पण कुंडलीत शनि-मंगळाची स्थिती योग्य असेल तर या दरवाजातून घरात सुख-समृद्धी प्रवेश करते.

घराचा मुख्य दरवाजा ईशान्य दिशेला असेल तर नक्कीच शुभ फळ मिळते. पण जर कुंडलीत गुरुची स्थिती ठीक नसेल तर यातून गंभीर आजार घरात प्रवेश करतात. घराचा (Home) मुख्य दरवाजा जर वायव्य दिशेला असेल तर साधारणतः शुभ फल मिळते. पण कुंडलीत शनि जर त्रासदायक असेल तर मित्रही शत्रू होतात.

घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. या दरवाजावर आंब्याच्या पानांचा हार असावा. पूजा करावी. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस गणपती बाप्पाचे चित्र लावावे. मुख्य प्रवेशद्वारावर डाळिंब आणि शमीचे रोप लावा. यामुळे घराचा मुख्य दरवाजा शुभ राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa live News: वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूकीवर परिणाम

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

Goa Electricity: गोव्यात विजेची मागणी वाढणार दुपटीने! औद्योगिक उत्पादनात होणार वाढ; लोह-पोलाद उद्योग आघाडीवर

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

India Pakistan Tension: 'भारत- पाकिस्तानमधील अणुयुद्ध मी थांबविले'! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

SCROLL FOR NEXT