Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरासमोर नारळाचे झाड लावणे शुभ की अशुभ? वाचा एका क्लिकवर

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली झाडे आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतात.

Puja Bonkile

Vastu Tips: हिंदू धर्मात नारळाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक पूजेत त्याचा समावेश होतो. त्यालाच श्रीफळ असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार नारळाच्या झाडावर माता लक्ष्मी देवी वास करते. अनेकजण आपल्या घरासमोर नारळाची झाडे लावतात. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. घरासमोर नारळाचे झाड लावणे शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार घरासमोर नारळाचे झाड लावले पाहिजे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. यामुळे घरात सुख-समृद्धीही येते. जर तुम्ही घराबाहेर नारळाचे झाड लावण्याचा विचार करत असाल तर नक्की लावा. 

  • नोकरीत मिळेल यश

जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या व्यक्तीने घराच्या अंगणात नारळाचे झाड लावावे. यामुळे घरात कधीही नकारात्मकता पसरत नाही. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. 

  • समस्या कमी होतात

कष्ट करूनही यश मिळत नसेल तर डोक्यावर 21 वेळा नारळ फिरवावे आणि देवी स्थानावर जाळावे. हे तुम्हाला दर मंगळवारी आणि शनिवारी करायचे आहे. यामुळे तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि आजारांपासूनही आराम मिळेल. 

  • नारळाच्या पाण्याचा वापर

घरामध्ये नारळाचे पाणी शिंपडल्याने सकारात्मक उर्जा घरात प्रवेश करते. व्यक्तीला कधीही घरगुती त्रास सहन करावा लागत नाही. याशिवाय कुटुंबातील परस्पर संबंधही दृढ राहतात. 

  • घरात सुख-शांती येते

घरामध्ये नारळाचे झाड लावणे फार महत्वाचे आहे. यामुळे घरात माता लक्ष्मी वास करते  आणि व्यक्तीला सुख, समृद्धी आणि शांतीही मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT