Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: देवी-देवतांना दिवसानुसार अर्पण करावे विड्याची पानं, आर्थिक समस्या होतील दूर

हिंदू धर्मात वनस्पती आणि त्यांच्या पानांना खास महत्त्व आहे. हे देवी-देवतांच्या पूजेत वापरले जातात. ज्यामुळे व्यक्तीला कामात यश प्राप्त होते.

Puja Bonkile

Vastu Tips: हिंदू धर्मात विड्याच्या पानांचा वापर सर्व देवी-देवतांच्या पूजेसाठी आणि शुभ कार्यात केला जातो. असे मानले जाते की देवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारचे नैवेद्य आणि सुपारीची पाने अर्पण केल्यास अधिक प्रसन्न होतात.

विड्याच्या पानांचा उपयोग पूजेसाठी केला जातो. पण कोणत्या दिवसानुसार विड्याची पान देवी-देवतांना अर्पण करावीत हे जाणून घेऊया.

सोमवार

सोमवारी बेलपानासह विड्याने पाने भगवान शिवाला अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळू शकते.

मंगळवार

मंगळवारी पवनपुत्र हनुमानाला विड्याच्या पानात केशरी सिंदूर अर्पण करावे. यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद अबाधित राहतो आणि व्यक्तीचे मन शांत राहते.

बुधवार

बुधवारी श्रीगणेशाला विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन अर्पण करावे. याच्या मदतीने तुम्ही सुख आणि समृद्धी मिळवू शकता. तसेच सर्व अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकता.

गुरुवार

गुरुवारी विड्यांच्या पानांवर हळदीची पेस्ट लावून हार बनवा आणि भगवान विष्णूला अर्पण करावे. यामुळे भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुम्हाला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

शुक्रवार

शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी विड्याचे पानं अर्पण करावी. यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक नुकसानीची समस्या भेडसावणार नाही आणि सन्मानही मिळवू शकता.

शनिवार

शनिवारी विड्याच्या पानात काळे तीळ टाकून आणि मोहरीचे तेल घालून शनिदेवाला अर्पण करावे. याने शनिदोषापासून मुक्ती मिळून सौभाग्यही प्राप्त होते.

रविवार

रविवारी सूर्यदेवाला विड्याच्या पानांसह अर्घ्य अर्पण करावे. यामुळे मान-सन्मान मिळू शकतो. तसेच आजारांपासूनही मुक्ती मिळू शकते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT