Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरातील वास्तुदोष दुर करण्याचे पाच सोपे आणि कमी खर्चाचे उपाय, आजच ट्राय करा

घरातील वास्तु दोष दूर करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येऊ शकतो, ज्यामुळे घरातील वास्तुदोष सहज दूर होतील.

गोमन्तक डिजिटल टीम

Vastu Tips For Vastudosh: स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पै-पै जोडून आपण कष्टाने घर विकत घेतो. खरेदी केलेले घर आपल्या इच्छेनुसार डिझाइन करून घेतो. पण कधी कधी थोड्या चूकाही वास्तुदोषाचे कारण बनतात. घरातील वास्तुदोषांमुळे (Vastudosh) आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरातील वास्तु दोष दूर करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येऊ शकतो, ज्यामुळे घरातील वास्तुदोष सहज दूर होतील.

फुलदाणी

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना करा. कलश हे श्री गणेशाचे रूप मानले जाते. श्रीगणेश तुमच्या घरातच राहून तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मुक्ती मिळवून देईल.

घोड्याचा नाल

वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालला खूप महत्त्व आहे. घरामध्ये नाल लावल्याने वास्तुदोष दूर होतात. यासोबतच नशीबही खुलते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संपूर्ण घोड्याचा नाल जो U आकाराचा असेल तो लावावा.

पंचमुखी हनुमानाचा फोटो

तुमच्या घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर घराच्या बाजूला पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा. याचा खूप फायदा होतो. याशिवाय प्रवेशद्वारात पंचधातूचा पिरॅमिड लावता येईल.

कापूर

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर खूप फायदेशीर ठरू शकतो. घरामध्ये वास्तुदोष असलेल्या ठिकाणी कापूर ठेवा. यामुळे वास्तू दोष दूर होतील.

स्वस्तिक चिन्ह

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू लावून स्वस्तिक चिन्ह काढा. पण, हे स्वस्तिक नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT